एक तपापासूनचा उपक्रम
मोफत मधुमेह तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सलग बारा वर्षांपासून मधुमेहतज्ञ डॉ.अतुल शिंदे यांचा उपक्रम
अंबाजोगाई -: (वार्ताहर) समाजात वाढणारा मधुमेह रोखण्यासाठी विविधउपक्रम राबवत, मधुमेहींची मोफत तपासणी व उपचार करण्यासाठी सदैव अग्रेसर असणारे मधुमेह तज्ज्ञ डॉ अतुल शिंदे यांनी सोळाशे रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार केले.या उपक्रमाचे त्यांचे बारावे वर्ष आहे. गुरुवारी अंबाजोगाई येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी,आयएमए , ॲम्म्पा, व योगेश्वरी डायबेटीस केअर सेंटर, प्रशांतनगर,अंबाजोगाई यांच्या वतीने मधुमेहावरील महाशिबीर व मोफत तपासण्या व मोफत औषध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटक म्हणून आयएमए चे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गणपत व्यास हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आयएमए चे अंबाजोगाई अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे,डॉ.श्रीनिवास रेड्डी,डॉ.राजेश इंगोले,डॉ.सुलभा पाटील,रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी,संयोजक डॉ अतुल शिंदे,डॉ.स्वाती शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या शिबिरात मधुमेह तज्ज्ञ डॉ अतुल शिंदे यांनी सोळाशे रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार केले.तसेच मधुमेह रोखण्यासाठी युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक महिन्यात मोफत रक्त तपासणी शिबिर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. मधुमेह कसा रोखता येईल? यासाठी त्यांनी अनेक उपाय सांगून जीवन जगताना आहार,व्यायाम व तणावमुक्त जीवन जगण्याचा सल्ला दिला.
यावेळी बोलताना गणपत व्यास म्हणाले की, डॉ.अतुल शिंदे हे सेवाभाव जोपासून आरोग्य सेवा देतात.समाजाशी असलेली बांधिलकी त्यांनी जोपासली म्हणूनच आज अनेकजण मधुमेहाच्या दुष्परिणामा पासून दूर आहेत. यावेळी डॉ.रामकृष्ण लोंढे, डॉ. नवनाथ घुगे, डॉ श्रीनिवास रेड्डी, डॉ सुलभा पाटील,डॉ.राजेश इंगोले यांनी आपले विस्तृतपणे मनोगत व्यक्त केले.
धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे संचालन विनायक मुंजे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार धनराज सोळंकी यांनी मानले.यावेळी अंबाजोगाई पंचक्रोशीतील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा