लाडक्या बहिणीने केली जादू:आ.पंकजा मुंडेंच्या झंझावती नेतृत्वाचा विधानसभा निवडणुकीत करिश्मा !
आ.पंकजा मुंडेंच्या झंझावती नेतृत्वाचा विधानसभा निवडणुकीत करिश्मा
सभा घेतलेल्या २७ उमेदवारांपैकी महायुतीचे २३ उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी
मुंबई ।दिनांक २३।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा स्टार प्रचारक आ. पंकजाताई मुंडे यांच्या धडाकेबाज नेतृत्वाचा करिश्मा विधानसभा निवडणुकीतही दिसून आला हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. त्यांनी प्रचार सभा घेतलेल्या २७ उमेदवारां पैकी २३ उमेदवार प्रचंड मतांनी झाले तर चार उमेदवारांचा निसटता पराभव झाला. दरम्यान, सर्व विजयी उमेदवारांचे आ. पंकजाताईंनी अभिनंदन केले आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या आ. पंकजाताई मुंडे यांनी स्वतःच्या बीड जिल्हयात उमेदवारांसाठी दोन दोन सभा तर घेतल्याच पण त्याच बरोबर राज्यातही ठिक ठिकाणी जोरदार प्रचार करून भाजपा महायुतीच्या उमेदवारांना बळ दिले. केवळ भाजपच्याच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी देखील त्यांनी प्रचार सभा घेतल्या. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पंकजाताई मुंडे यांच्या खांद्यावर छोटीसी शस्त्रक्रिया झाली, तशा अवस्थेतही त्यांनी दुखणं सहन करत राज्यभर प्रचार केला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा राजकीय वारसा लाभलेल्या आ. पंकजाताई मुंडे यांच्या कणखर व फायरब्रॅड नेतृत्वाचा करिश्मा आजच्या निकालाने राज्यात पुन्हा एकदा दिसून आला.
सभा घेतलेले २७ पैकी २३ उमेदवार विजयी
आ. पंकजाताई मुंडे यांनी महायुतीच्या विजयासाठी कठोर मेहनत घेत ३५ हून अधिक सभा घेतल्या. काही ठिकाणी एकाहून अधिक सभा घेतल्या. त्यांनी सभा घेतलेल्या २७ मतदारसंघात २३ उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यात भाजपचे १८ व शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादीच्या ४ आमदारांचा समावेश आहे. बीड, मालेगाव वाशिम, सिंदखेडराजा, लोणार या ठिकाणी महायुतीला यश मिळू शकले नाही, त्यांनी सभा घेतलेल्या जागेवर महायुतीचे विजयी झालेले आमदार पुढीलप्रमाणे - सिध्दार्थ शिरोळे (शिवाजीनगर पुणे),कुमार आयलानी (उल्हासनगर),धनंजय मुंडे (परळी), नमिता मुंदडा (केज), विजयसिंह पंडीत (गेवराई), आकाश फुंडकर (खामगांव), सुरेश धस (आष्टी)मेघना बोर्डीकर (जिंतूर), दिलीप बनकर (निफाड), माधुरी मिसाळ (पुणे), श्रीजया चव्हाण (भोकर) भीमराव केराम (किनवट),तानाजी मुटकुळे (हिंगोली),प्रकाश सोळंके (माजलगांव), प्रताप अडसड (धामणगांव), सुरेश खाडे (मिरज) सीमा हिरे (नाशिक), जयकुमार रावल (सिंदखेडा), हिकमत उढाण (घनसावंगी), मोनिका राजळे (पाथर्डी),सचिन कल्याणशेट्टी (अक्कलकोट),महेश लांडगे (भोसरी), शिवाजीराव कर्डिले (राहुरी)
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा