प्राचार्य प्रदिप जबदे यांना मातृशोक: अनेकांकडून शोकसंवेदना
प्राचार्य प्रदिप जबदे यांना मातृशोक: अनेकांकडून शोकसंवेदना
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
छत्रपती संभाजीनगर येथे प्राचार्य पदावर कार्यरत राहिलेल्या प्राचार्य प्रदीप विष्णुपंत जबदे यांच्या मातोश्री श्रीमती अंबुताई जबदे यांचे वृद्धापकाळाने दि.31 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल आप्तेष्ट, स्नेहीजन, हितचिंतक, मित्र परिवार आदी सर्वांकडूनच शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. जबदे कुटुंब हे मूळ परळी येथील रहिवासी आहे.
परळीचे भूमिपुत्र असलेले प्राचार्य प्रदिप विष्णुपंत जबदे , कै.ॲड.उल्हास जबदे व कै. अनिल उर्फ राजाभाऊ जबदे यांच्या मातोश्री श्रीमती अंबुताई विष्णुपंत जबदे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 98 व्या वर्षी दिनांक 31/10/24 रोजी निधन झाले.छ. संभाजीनगर येथे त्यांच्यावर अंत्यविधी झाले.त्यांच्या पश्चात मुलगा,सुना नातवंडे, पंतवंडे असा मोठा परीवार आहे. जबदे कुटुंबपरळीतील सर्व परिचित कुटुंब आहे. प्राचार्य प्रदीप जबदे यांचा मोठा मित्रपरिवारही परळीत आहे. प्राचार्य प्रदीप जबदे व कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खद प्रसंगी परळीतूनही सर्व स्तरातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत. जबदे कुटुंबाच्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा