केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.....
प्रितम मुंडे यांनी मागणी केलेल्या सर्व रस्ते विकास कामांना मान्यता दिली
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अंबेजोगाईच्या जाहीर सभेत ग्वाही
अंबाजोगाई ( दि.१३. ) बीड जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासासाठी जेंव्हा-जेंव्हा डॉ.प्रितमताई मुंडे यांनी माझ्याकडे मागणी केली तेंव्हा त्यांच्या प्रत्येक मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांनी सांगितलेले रस्ते विकासाचे प्रत्येक काम पूर्ण केल असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अंबेजोगाई येथील जाहीर सभेत दिली. मागील दहा वर्षांत बीड जिल्ह्यात दर्जेदार रस्ते निर्माण झाले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना याची प्रत्यक्ष प्रचिती येत असताना आता खुद्द नितीन गडकरी यांनी डॉ. प्रितमताई मुंडे यांचे कौतुक केले आहे. त्यांनी केलेल्या कौतुकाने पुन्हा एकदा डॉ. प्रितमताई मुंडे यांचे कर्तृत्व आणि विकास कामांसाठी निधी खेचून आणायची क्षमता अधोरेखित झाली आहे.
महायुतीच्या उमेदवार श्रीमती नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ अंबेजोगाई येथे आयोजित प्रचार सभेला नितीन गडकरी यांनी संबोधित केले. यादरम्यान बोलत असताना त्यांनी सांगितले कि बीड जिल्ह्याच्या खासदार असताना डॉ. प्रितम मुंडे यांनी दिलेल्या प्रत्येक निवेदनाची दखल घेऊन त्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. प्रितमताईंच्या आणखी काही मागण्या प्रलंबित आहेत. येणाऱ्या काळात सर्व मागण्या पूर्ण करून बीड जिल्ह्याच्या रस्ते विकासाचे प्रश्न मार्गी लावली जातील. याप्रसंगी मंचावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे, डॉ. प्रितमताई मुंडे,आ.नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा