परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

माधुरीताईंना विक्रमी मताधिक्य मिळेल

आ.पंकजाताई मुंडेंच्या भव्य प्रचार रॅलीने  पर्वती मतदारसंघांतील वातावरण ढवळले !

विकास कामांच्या जोरावर माधुरीताई मिसाळ चौथ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होतील


पुणे ।दिनांक ०६।

पर्वती मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार माधुरीताई मिसाळ यांच्या प्रचारार्थ भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांच्या बुधवारी संध्याकाळी निघालेल्या भव्य प्रचार रॅलीने वातावरण अक्षरशः ढवळून निघाले. माधुरीताई ह्या सर्व सामान्य जनतेच्या उमेदवार आहेत, त्यांनी मतदारसंघांत केलेल्या विकास कामांमुळे त्या सलग चौथ्यांदा विक्रमी मताधिक्य घेऊन विजयी होतील असा विश्वास आ. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.


   भाजपा महायुतीच्या उमेदवार माधुरीताई मिसाळ यांच्या प्रचारार्थ पर्वती मतदारसंघांतील जनता वसाहतीत काल आ. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत मतदार बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते. सुमारे तीन तास चाललेल्या या रॅलीत मतदारांचा मोठा उत्साह आणि जल्लोष पहायला मिळाला. वाजतगाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत व जेसीबीतून फुलांची उधळण करत भल्या मोठ्या पुष्पहाराने आ. पंकजाताईंचे जागोजागी स्वागत झाले. महिलांनी देखील औक्षण करत त्यांचं जंगी स्वागत केलं. भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात मोठया संख्येने सहभागी झाले होते.


माधुरीताईंना विक्रमी मताधिक्य मिळेल

-----------

ही प्रचाराची रॅली नसून माधुरीताईंच्या विजयाचीच ही रॅली आहे. माधुरीताई माझी मोठी बहिण आणि मैत्रीण देखील आहे.  लोकनेते मुंडे साहेबांपासून आमचं आणि त्यांच्या परिवाराचे जिव्हाळ्याच नातं आहे. आम्ही विधानभवनात एकत्र काम केले आहे, त्यांनी सर्व सामान्य जनतेच्या भल्यासाठी चांगले काम केले आहे, त्यामुळे या निवडणुकीत त्या चौथ्यांदा मोठया मताधिक्याने विजयी होतील यात शंका नाही. महायुती सरकारने लाडक्या बहिणीचा सन्मान केला. जनतेला धान्यापासून ते घरापर्यंत अनेक योजना दिल्या. गेल्या ७५ वर्षात जेवढे काम झाले नाही तेवढे १५ वर्षात झाले. माधुरीताई सर्व सामान्य जनतेच्या उमेदवार असल्याने त्यांचा विजय कोणी रोखू शकत नाही अशा शब्दांत यावेळी आ. पंकजाताईंनी मतदारांशी संवाद साधला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!