राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य: कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर तरीही परळीतील प्रयाग कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क !

 राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य: कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर तरीही परळीतील प्रयाग कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क !


परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...
         विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. खऱ्या अर्थाने हा लोकशाहीचा उत्सव आहे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक असून हे आपले कर्तव्य असल्याची भावना नागरिकांमध्ये असल्याची उदाहरणे दिसून येतात. असेच उदाहरण परळी येथे घडले असून घरातील आजीचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही परळीतील प्रयाग कुटुंबियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

     परळी वैजनाथ येथील मोंढा भागातील सर्वपरिचित प्रयाग इलेक्ट्रिकल्स चे संचालक हरीश व गिरीश प्रयाग यांच्या आजी कावेरीबाई रंगनाथराव प्रयाग यांचे दि.१९ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. कावेरीबाई रंगनाथराव प्रयाग या अतिशय कुटुंबवत्सल, धार्मिक, मनमिळावू व प्रयाग कुटुंबाच्या आधारवड म्हणून परिचित होत्या. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडं,पतवंडं असा परिवार आहे. सुधीर रंगनाथराव प्रयाग यांच्या त्या आई होत तर हरीश, गिरीश शिवाजीराव प्रयाग यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज दि. २० रोजी परळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. परळीतील विद्यानगर भागातील रहिवासी असलेले प्रिया कुटुंब हे सर्व परिचित आहे. आज मतदान प्रक्रिया सुरू असताना त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आजीच्या निधनाने हे कुटुंब दुःखात असतानाही त्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यात मात्र कसूर केली नाही. दुःखद अंतकरणाने का होईना परंतु आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जात या संपूर्ण प्रयाग कुटुंबाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार