आणखी एक खळबळजनक विनयभंगाचा प्रकार

खळबळजनक: परळीत आणखी एक विनयभंगाचा प्रकार: नऊ वर्षे वयाच्या चिमुरडीशी अश्लील चाळे !


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
                परळी शहरात विनयभंगाच्या प्रकरणांचा सिलसिलाच सुरू झाला असून सध्या चर्चेत असलेल्या डॉक्टरने केलेल्या विनयभंगाच्या प्रकारानंतर आणखी एक खळबळजनक असा विनयभंगाचा प्रकार समोर आला आहे. आपल्या मुलीच्या, नातीच्या वयाच्या असलेल्या एका नऊ वर्षाच्या चिमुरडीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, परळीतील गंगासागरनगरमध्ये यातील आरोपीने फिर्यादीची ९ वर्षाची नातही आरोपीच्या घरी खेळण्याकरीता गेली असता हा विनयभंगाचा प्रकार केला आहे.आरोपी लखन घनघाव वय 35 वर्ष रा. गंगासागार नगर परळी याने घरी खेळण्यासाठी आलेल्या चिमुरडीला मांडीवर बसवून तिच्याशी अश्लील चाळे केले,विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले.याप्रकरणी पिडीतेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुरनं-210/2024 कलम 74. बी एन एस 8, 10, 12 पोक्सो ॲक्ट 2012 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास  सपोनि जाधवर  पिंक पथक अंबाजोगाई  हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना