जगद्‌गुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती येणार !

श्रीक्षेत्र दत्तधाम सारडगाव येथे श्री.दत्तात्रय भगवान (त्रिमुखी) प्राणप्रतिष्ठा सोहळा, दत्तयाग व चार दिवसीय कीर्तन महोत्सव 

सोहळ्याला बद्रिनाथहून जगद्‌गुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यासह संत महंत राहणार उपस्थित

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

         बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या पावन पंचक्रोशीत निर्माण होत असलेल्या श्री क्षेत्र दत्तधाम (अध्यात्मिक उन्नती केंद्र), गोपाळपुरा, सारडगांव, परळी-धर्मापुरी रोड, परळी वैजनाथ, जि. बीड येथे श्री.दत्तात्रय भगवान (त्रिमुखी) प्राणप्रतिष्ठा सोहळा, दत्तयाग व चार दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या भव्य दिव्य सोहळ्याला बद्रिनाथहून जगद्‌गुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यासह संत महंत  उपस्थित राहणार आहेत.

      ह.भ.प. विद्यावाचस्पती डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज (निर्माणकर्ते श्री. दत्तधाम, अध्यामिक उन्नती केंद्र) यांनी या सोहळ्याबाबत सविस्तर माहिती दिली.मार्गशीर्ष प्रतिपदा, सोमबार दि. २ डिसेंबर २०२४ ते मार्गशीर्ष शुक्ल विनायक चतुर्थी, गुरुवार दि. ५ डिसेंबर २०२४ या चार दिवसीय कालावधीत हा अध्यात्मिक सोहळा होणार आहे.श्री.दत्तात्रय भगवान (त्रिमुखी) प्राणप्रतिष्ठा सोहळा, दत्तयाग होणार असुन यज्ञाचार्य: पूज्यनीय पं. राजराजेश्वर दीक्षित (ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग पुजारी, म.प्र.) हे असणार आहेत. 'परमाराध्य' परमधर्माधीश उत्तरामनाय ज्योतीष्पीठाधीश्वर जगद्‌गुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती '१००८'  (ज्योतिर्मठ, बद्रिनाथ, उत्तरांचल) यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा तर कलशारोहण सोहळ्याला प.पू. महामंडलेश्वर स्वामी देवेंद्रानंदगिरी (अध्यक्षः वेदांत आश्रम, बहादूरगड, उपाध्यक्षः अखिल भारतीय संत्र समिती), ह.भ.प. मारोतीबाबा कुरेकर (माजी अध्यक्ष जोग महाराज वारकरी शिक्षम संस्था, आळंदी),प.पू. वेदांताचार्य विद्यावाचस्पती डॉ. माणिकशास्त्री मुखेकर (वाराणसी, आळंदी) उपस्थित राहणार आहेत.

       या सोहळ्यास ना. धनंजय मुंडे, आ. पंकजाताई मुंडे,राहुल भैय्या कराड साहेब (मा. कार्यकारी अध्यक्ष माईर्स एमआयटी पुणे) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे तसेच भागवतराव कराड (माजी केंद्रीय अर्थ राजयमंत्री), मा. आ.चंद्रकांत सोनवणे (चोपडा, जळगांव ), संजय दौड माजी विधान परिषद सदस्य,बुधाजी पानसरे उद्योजक, नाशिक यांच प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या संपूर्ण सोहळ्यास विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथराव कराड  (संस्थापक- अध्यक्ष, माईर्स एम्. आय. टी., पुणे) यांची प्रेरणा असुन ह.भ.प.डॉ. नामदेवशास्त्री सानप महाराज (श्री क्षेत्र भगवानगड) हे आशिर्वादपर सदिच्छा भेट देणार आहेत. न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांचे या सोहळ्यास विशेष सहकार्य लाभणार आहे. व्यवस्थापक समस्त ग्रामस्थ मंडळी, सारडगांव, नंदनज हे आहेत.

• चार दिवसीय कीर्तन महोत्सव...

    या सोहळ्यात चार दिवसीय कीर्तन महोत्सव  आयोजित करण्यात आला असुन महाराष्ट्रातील ख्यातनाम व जेष्ठ श्रेष्ठ किर्तनकार किर्तनसेवा करणार आहेत. यामध्ये व्याकरणाचार्य: ह.भ.प. अर्जुन महाराज लाड, महंत ह.भ.प. राधाताई सानप (आईसाहेब) (श्री क्षेत्र मीराबाई संस्थान, पाटोदा),ह.भ.प. बापूसाहेब मोरे महाराज (जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज - श्री क्षेत्र पंढरपूर) तर काल्याचे कीर्तन विद्यावाचस्पती ह.भ.प. डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज (नंदनज, ह. मु. नाशिक) यांचे होणार आहे. या महोत्सवात वारकरी संप्रदायातील गुणवान किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, भजनी मंडळी आदी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

       सोमवार, दि. २ डिसेंबर ते गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ प्रणप्रतिष्ठा सोहळा व दत्तयाग विधी,भजन, कीर्तन ,श्री.दत्तात्रय भगवान (त्रिमुखी) प्राणप्रतिष्ठा सोहळा, दत्तयाग व  कीर्तन महोत्सव सोहळ्याचा व अध्यात्मिक पर्वणीचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प. विद्यावाचस्पती डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज (निर्माणकर्ते श्री. दत्तधाम, अध्यामिक उन्नती केंद्र) यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार