यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन साजरा
यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन साजरा
परळी वैजनाथ...परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक संविधान प्रस्तावनेचे वाचन करत संविधान दिन साजरा करण्यात आला.
26 नोव्हेंबर हा दिवस देशात संविधान दिन म्हणुन साजरा केला जातो याच अनुषंगाने नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते करून सामूहिक संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले.
या वेळी यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.ए.ए.मुंडे मॅडम, प्रा.पी.पी.तिडके मॅडम,प्रा. एस.आर.कापसे, प्रा.यु.एन.फड, प्रा.ए.डी.शेख, प्रा.पी.पी.परळीकर, एस.बी. अष्टेकर,व्ही.एन.शिंदे , ए.बी.जगतकर ,जी. व्ही.कांबळे यु.बी.जगताप यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा