आखाडा विधानसभेचा: परळी मतदारसंघ : राजकीय विश्लेषण....

आखाडा विधानसभेचा: बसपा वगळता ना वंचित, ना एमआयएम ना मनसे ना आरएसपी परळीत 'ओन्ली एनसीपी' !


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
       सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले व काल अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती यातून कोणकोण मैदानात उतरले आहे हे चित्र स्पष्ट झाले आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय पक्षांच्या दावेदार्यांचा विचार केला तर प्रमुख व चर्चेतील राजकीय पक्षांपैकी बसपा वगळता ना वंचित, ना एमआयएम ना मनसे ना आरएसपी परळीत ओन्ली एनसीपी अशीच स्थिती निर्माण झालेली आहे.
       सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांपैकी कोणकोणते उमेदवार उभे राहणार याची जेवढी उत्सुकता असते तेवढीच ती अन्य राजकीय पक्षांबाबतही असते. परळी मतदारसंघातील निवडणूकीची सद्यस्थिती बघितली तर याठिकाणी आता केवळ ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राजकीय पक्षांचा विचार केला तर याठिकाणी सरळ सरळ राष्ट्रवादी काँग्रेस च्या दोन गटांमध्येच लढत होणार असे चित्र आहे. भाजपची ही पारंपारिक जागा होती मात्र महायुतीत ही जागा अजित पवारांकडे गेली. काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांच्या पक्षासोबत असल्याने त्यांचीही आघाडी आहे. अन्य स्वबळावर निवडणूक लढणाऱ्या राज्यातील अन्य राजकीय पक्षांकडूनही परळी विधानसभेत संधी घेतली गेली नसल्याचेच दिसते.यामध्ये राज ठाकरेंच्या मनसेने उमेदवारी घोषित करताना परळीची जागाही घोषित केली होती मात्र मनसेने जाहीर केलेल्या उमेदवाराने अर्ज दाखल पर करण्यापूर्वीच माघार घेतली त्यानंतर मनसे कडून ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले ते छाननीच बाद झाले. त्यामुळे परळी मतदारसंघातून मनसेचे प्रतिनिधित्व दिसणार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी कडून परळी मतदारसंघ लढवला जाईल अशी शक्यता वाटत असताना वंचित नेहमी या ठिकाणी आपला उमेदवार दिलेला नाही.मुस्लिम मते मिळावीत आणि अधिकाधिक राज्यात पक्षाचा विस्तार व्हावा, या उद्देशाने असदुद्दीन ओवेसी यांनी एमआयएम पक्ष हैदराबादमधून बाहेर काढून महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयत्न केला.यावेळी देखील ते जास्तीतजास्त उमेदवार उतरवतील, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्ष जागावाटप समोर आले तेव्हा अनेकांना धक्का बसला. कारण यावेळी ओवेसींनी अवघ्या 14 जागांवर उमेदवार दिले आहेत. आपला हात आखडता घेतला आहे. एम आय एम च्या वतीनेही परळी मतदारसंघात उमेदवार देण्यात आलेला नाही महादेव जानकर यांच्या रासपने अनेक ठिकाणी आपले नशीब आजमावले आहे. मात्र आरसीपी ने ही परळी मतदारसंघात आपली उमेदवारी किंवा पक्षाचे प्रतिनिधित्व केल्याचे दिसत नाही. प्रमुख लढत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यातच होणार आहे.याशिवाय बसपाने  ॲड. डी.एल. उजगरे यांना उमेदवारी दिली आहे.केदारनाथ वैजनाथ जाधव हे पीजेन्टस् ॲन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाकडून तर विकास इंडिया पार्टीकडून भागवत बबनराव वैद्य हे निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर मराठवाडा मुक्ती मोर्चाकडून साहस पंढरीनाथ आदोडे निवडणूक लढवीत आहेत.
        एकंदरीत परळी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथे बसपा वगळता ना वंचित, ना एमआयएम ना मनसे ना आरएसपी परळीत ओन्ली एनसीपी असेच चित्र आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार