*व्वा रे अश्वासन....काय तर म्हणे मी आमदार झालो तर सगळ्या पोरांचे लग्नं करु !

अजब अश्वासन -अफलातून प्रचाराचा फंडा: परळी मतदारसंघातील हे उमेदवार म्हणाले, 'मला आमदार करा;बिनालग्नाच्या सगळ्या पोरांची लग्न करु !

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
         निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोण काय म्हणेल आणि प्रचार करण्यासाठी कोणते आश्वासने देईल हे न बघितलेलेच बरे. प्रचाराच्या भाषणांमधून वाटेल ते बोलणे आणि मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न सगळेच राजकीय नेते करत असतात यातून काही मजेशीर प्रसंग ही उद्भवतात. त्याचबरोबर काही वक्तव्यावरून साधक- बाधक चर्चा घडतात, काही विधाने वादग्रस्त ठरतात, सोशल मीडियातून त्यावर ट्रोलिंग केलं जातं अशा वेगवेगळ्या पद्धतीने कोण कोणते वाक्य कोणत्या अर्थाने घेईल हे सांगता येत नाही. असाच एक मजेशीर प्रसंग आता परळी मतदार संघातील एका उमेदवाराच्या भाषणातून चर्चेला आला आहे.
          परळी विधानसभा निवडणुकीत आपल्याला निवडुन द्यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी घाटनांदूर येथे झालेल्या जाहीर सभेत भाषणातून लग्नाचा फंडा वापरला आहे. मतदार संघातील तरुण अविवाहित मुलांना त्यांनी मला निवडून द्या मी तुमची लग्न करुन देतो असे आवाहन केले आहे.विधानसभा निवडणुका या विकासाच्या प्रश्नावर लढवण्याचा पारंपारिक प्रघात आपल्या कडे आहे. मात्र अलिकडे याला जातीय स्वरुप मिळाल्याचे दिसत असतांना आता त्याच्याही पलिकडे जाऊन लग्नाच्या विषयाला हात घालण्यात आला आहे. महाराष्ट्रात मुलींचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे व विशेषतः मुलींना नोकरीवाला, सधन कुटुंबातील, भरपुर पॅकेज असलेला मुलगाच आपला साथीदार असावा असे वाटत असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील तरुणांची वये 40 पार होत आली तरी त्यांना मुलगी मिळत नाही. अशा परिस्थितीत गावोगावी तरुण अविवाहित मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर झाली आहे. हाच मुद्दा प्रकर्षाने महत्वाचा मानत राजेसाहेब देशमुख यांनी आपल्या प्रचार सभेतील भाषणात "मला निवडून द्या मी तुमची लग्न लावून देतो" अशी साद घातली आहे. राजेसाहेब देशमुख हे परळी विधानसभा मतदारसंघातील ना. धनंजय मुंडे यांचे विरोधात प्रबळ उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार