परळीतील मतदान केंद्रांना भेटी देऊन घेतला मतदानाचा आढावा
आ.पंकजा मुंडे, डॉ.प्रीतम मुंडे व कुटुंबियांनी नाथ्रा येथे बजावला मतदानाचा हक्क
परळीतील मतदान केंद्रांना भेटी देऊन घेतला मतदानाचा आढावा
परळी ।दिनांक २०।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ पंकजाताई मुंडे, माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे व कुटुंबियांनी आज नाथरा येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर आ. पंकजाताई मुंडे यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला.
आ. पंकजाताई मुंडे, त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, भगिनी माजी खा. डॉ. प्रितमताई मुंडे, यशःश्रीताई मुंडे यांनी दुपारी १२.१५ वा. नाथरा या त्यांच्या गावी जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. सकाळपासूनच वातावरणात उष्णता जाणवत होती तरीही मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करताना दिसत होते. जागोजागी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या, या भागातील जनता नेहमीच विकासाच्या बाजूने राहिली आहे, जातीपातीला त्यांनी कधीच थारा दिला नाही. परळीची जागा आम्ही सहज जिंकू असं त्या म्हणाल्या.मतदानानंतर आ. पंकजाताईंनी परळीत येऊन शहरातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी बुथ कार्यकर्त्यांकडून मतदानाचा आढावा घेतला.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा