जाणून घ्या - परळीच्या निवडणूकीची 'ही' आहेत खास सहा वैशिष्ट्ये

 'परळीचा लेक- नंबर एक' प्रत्यक्षात :धनंजय मुंडेंचा ऐतिहासिक विजय व निवडणूक-'ही' आहेत खास सहा वैशिष्ट्ये

रळी वैजनाथ, प्रतिनिधी....
       "परळीचा लेक नंबर एक" हे टॅगलाईन निकालानंतर खरोखरच प्रत्यक्षात  उतरल्याचे दिसुन येत आहे.
संपूर्ण राज्यात चर्चेचा ठरलेला परळी विधानसभा मतदारसंघ, हा मुंडे परिवाराचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.या बालेकिल्ल्यात मुंडेंना चोहोबाजूंनी घेरण्याचे शर्तीचे प्रयत्न केल्यानंतरही परळी विधानसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला ऐतिहासिक विजयाने सर करण्यात धनंजय मुंडे यांनी यश मिळवले आहे. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी मताधिक्य मिळविण्याचा इतिहास रचला आहे. त्यांनी 194889 एवढी मते घेतली तर तब्बल एक लाख 40 हजार 224 मतांचे मताधिक्य घेत विजयश्री खेचून आणलीआहे.धनंजय मुंडेंच्या ऐतिहासिक विजयाची विविधांगी अनेक वैशिष्ट्ये आहेत.
       परळी मतदारसंघात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच राजेसाहेब देशमुख यांच्या उमेदवारीवरून विरोधाची नगण्य, थोडीफार असलेली मतदारसंघाची हवा बदलली. परळी मतदार संघाबाहेरचा रहिवासी असलेला उमेदवार दिल्याने या निवडणुकीचा पुर्णत: नूरच पालटून गेला. धनंजय मुंडे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून राजेसाहेब देशमुख प्रचाराच्या सुरुवातीपासूनच पिछाडीवर पडल्याचे चित्र होते. निवडणूक यंत्रणा राबवण्यात आणि कार्यकर्त्यांचा संच सक्रिय करण्यात त्यांना शेवटपर्यंतही यश आले नाही. त्यामुळे निवडणूक प्रचार काळातच ही निवडणूक संपूर्णतः एकतर्फी होईल असे चित्र निर्माण झाले. निवडणूक निकालानंतर हे स्पष्टही झाले आहे.

● धनंजय मुंडेंचा ऐतिहासिक विजय व निवडणूक:ही' आहेत सहा वैशिष्ट्ये

1. परळीचा लेक ठरला नंबर एक
        निवडणूक काळात 'परळीचा लेक नंबर एक' ही टॅगलाईन गाजली.मतदान यंत्रावर क्रमांक एकवर उमेदवार म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव होते.त्यामुळे प्रचारात ही टॅगलाईन जास्तीत जास्त प्रसारित झाली.सोशल मीडियावरही या टॅगलाईनने प्रचंड धुमाकूळ घातला होता.निवडणूक निकालानंतर प्रचारातली हीच टॅगलाईन खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरली आहे.महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या उमेदवारांपैकी प्रमुख तीन मध्ये धनंजय मुंडेंनी स्थान मिळवून इतिहास रचला आहे.

2. संख्यात्मक सर्वाधिक मते घेणाऱ्या टाॅप फाईवमध्ये धनंजय मुंडे
      परळी वैजनाथ विधानसभेच्या या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी मताधिक्य मिळविण्याचा इतिहास रचला आहे. तब्बल एक लाख 40 हजार 224 मतांचे मताधिक्य घेत विजयश्री खेचून आणली आहे. मताधिक्यात टाॅप थ्री ठरलेल्या धनंजय मुंडे यांनी 194889 एवढी मते घेतली आहेत. त्यामुळे राज्यातील संख्यात्मक सर्वाधिक मते घेणाऱ्या टाॅप फाईवमध्ये धनंजय मुंडे यांचा समावेश झाला आहे.

3. सामाजिक सलोखा कायम व आठरापगड जातीधर्मातील घटकांनी दाखवला विश्वास
           परळी वैजनाथ मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने या ठिकाणी मराठा कार्ड खेळत राजेसाहेब देशमुख यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले होते. सुरुवातीपासूनच या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना चोहोबाजूंनी घेण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीच्या अगदी सुरुवातीला लोकसभेचा अनुभव बघता परळी मतदारसंघाची निवडणूक ही मराठा विरुद्ध ओबीसी या वळणावर घेऊन गेल्यास या ठिकाणी धनंजय मुंडेंना रोखणे शक्य होईल असा कयास बांधण्यात आला. त्यामुळे ओबीसी मधील अनेक इच्छुक चेहऱ्यांना डावलत शरद पवारांनी उमेदवारी मराठा चेहरा असलेल्या राजेसाहेब देशमुख यांना दिली. मात्र धर्म व जातीभेदापलिकडे  जाउन वर्षानुवर्ष जनसेवेत असलेले मुंडे कुटुंब आहे यावरच शिक्कामोर्तब करत मतदारसंघातील सर्व धर्म, आठरापगड जातीसमुहातील  घटकांनी धनंजय मुंडेंना विक्रमी मताधिक्य देऊन विश्वास दाखवला. विकास हाच धर्म श्रेष्ठ ठरला.

4. मुंडेंची एकजूट: महाशक्ती एकवटली
             2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकमेका विरुद्ध निवडणूक लढवलेले पंकजा मुंडे व त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हे यावेळी मात्र राज्यात झालेल्या महायुतीमुळे एकत्र आले होते. मतदारसंघातील तुल्यबळ प्रतिस्पर्धी राहिलेले  मुंडे परिवारातील बहिण भाऊ एकत्र असल्याने या मतदारसंघात महाशक्ती एकवटली. याचा निश्चित चांगला परिणाम या निवडणूक निकालातून दिसून येणार अशी सर्वांनाच खात्री होती आणि निवडणूक निकालानंतर समोर आलेल्या आकडेवारीने हे सिद्धही झाले आहे. पंकजाताई मुंडे यांचे समर्थक व स्वतःचे समर्थक यांचा सुयोग्य समन्वय साधून राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप-शिवसेना व मित्रपक्ष यांची मोट बांधली. विक्रमी यशाला गवसणी घालण्यात हे महत्वाचे वैशिष्ट्य ठरले.

5. राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरील कोणत्याही नेत्यांची ना सभा ना प्रचारात सहभाग
    परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघाच्या यंदाच्या निवडणुकीत ज्या प्रचाराच्या सभा झाल्या त्या स्वतः उमेदवार असलेले धनंजय मुंडे व भगिनी भाजपच्या स्टार प्रचारक पंकजा मुंडे,माजी खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्याच झाल्या. या निवडणुकीत राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरील कोणत्याही नेत्यांची ना सभा झाली ना प्रचारात सहभाग घेण्यात आला. याउलट स्वतः उमेदवार असलेले धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर ठिकाणच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्यात  अनेक सभा घेतल्या. तसेच भाजपच्या स्टार प्रचारक पंकजा मुंडे यांनीही महायुतीच्या राज्यातील ठिकठिकाणच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या.

6. अबोल निवडणूक:ना शक्तिप्रदर्शन ना आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी
     परळी मतदारसंघाची निवडणूक म्हणजे राजकीय क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठा पणाला लागणारी निवडणूक असते हा आजपर्यंतचा अनुभव असायचा. निवडणूकीची सर्वार्थाने खरी रणधुमाळी इथे बघायला मिळायची. याशिवाय धनंजय मुंडेंचा कोणताही कार्यक्रम असो की सभा,समारंभ हे भव्य दिव्य आणि प्रचंड शक्तिप्रदर्शन हे जणू समिकरणच झालेले आहे. मात्र यावेळची निवडणूक याला अपवाद ठरली आहे. अत्यंत साधेपणाने उमेदवारी दाखल करण्यात आली. जाहीर सभा झाल्या त्याही नैसर्गिकरित्या यामधूनही कुठेच शक्तिप्रदर्शन करण्यात आले नाही. शक्तिप्रदर्शन करीत समारोप सभासुद्धा घेण्यात आली नाही. विजयी मिरवणूकही शक्तिप्रदर्शन करण्यासाठी झाली नाही जी गर्दी झाली ती उत्स्फूर्तता होती.त्यामुळे ना शक्तिप्रदर्शन ना आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी अशा अर्थाने एकप्रकारे अबोल निवडणूक असे एक वैशिष्टय या निवडणुकीचे ठरले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना