इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

मंत्री असताना महिलांसाठी अनेक योजना राबविल्या

शिरोळेंच्या वतनात, आ. पंकजाताई मैदानात!

सिध्दार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ पुण्यात आ. पंकजाताई मुंडेंचा महिला मेळावा


स्त्रियांना सन्मान व सुरक्षा देणाऱ्या महायुतीला पुन्हा सत्तेत आणा


पुणे ।दिनांक ०६।

राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या सरकारने स्त्रियांना सन्मान व सुरक्षा देण्याचे काम केले. लाडकी बहिण सारखी योजना राबवून आत्मविश्वास निर्माण केला त्यामुळे आता पुन्हा एकदा महायुतीला सत्तेत आणण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. एक संस्कारी चेहरा असलेल्या सिध्दार्थ शिरोळे यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी येथे केले.


शिवाजीनगर (पुणे) विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार सिध्दार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ बुधवारी आ. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळावा आयोजित करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी सुजाता शिरोळे, वर्षा डहाळे, हर्षदा फरांदे, श्रध्दा शिंदे, लावण्या शिंदे, भावना शेळके, सुवर्णा त्रिगुणाईत आदींसह महायुतीच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


   पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, महायुती सरकारने राज्यात महिलांसाठी अनेक योजना अंमलात आणण्याबरोबरच महिलांचा सन्मान व सुरक्षा याला प्राधान्य दिले. महाराष्ट्राचे नुकसान होवू द्यायचे नसेल तर एकेक आमदार निवडून येणे आवश्यक आहे. राजकारणात स्त्रियांना सन्मान देणारे, संस्कृती जपणारे व्यक्ती येणे गरजेचे आहे, त्यासाठी संस्कारी आणि विकासाला प्राधान्य देणारा चेहरा म्हणून सिध्दार्थ शिरोळे यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना विक्रमी मतांनी विजयी करा असं आवाहन यावेळी आ. पंकजाताईंनी केलं. 

मंत्री असताना महिलांसाठी अनेक योजना राबविल्या

--------

मंत्री असताना महिलांच्या उत्थानासाठी अनेक योजना राबविल्या. बचतगटांना शुन्य टक्के दराने कर्ज देऊन प्रोत्साहन दिले. बेटी बचाओ बेटी पढाओ, शौचालय बांधकाम, नीर (जल) आणि नारीसाठी काम केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत, त्यांनी देशाचा विकास केला तसाच राज्यातही विकासाचे जाळे निर्माण केले आहे. महाराष्ट्राचं नुकसान होवू द्यायचं नसेल तर त्यांच्या नेतृत्वात पुन्हा महायुती सत्तेवर येणं आवश्यक आहे, त्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडून आणा असं आवाहन यावेळी आ. पंकजाताईंनी केलं.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!