ना. धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित - संगमेश्वर फुटके

 ना. धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित - संगमेश्वर फुटके

परळी वैजनाथ....सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणाऱ्या, परळीतील सामान्य जनतेच्या कामासाठी सदैव तयार असलेल्या नामदार धनंजय मुंडे यांना तेली समाजातील सर्वांनी आपले मतदान करून भरघोस पाठिंबा द्यावा असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा बीड जिल्हा अध्यक्ष श्री संगमेश्वर फुटके यांनी केले आहे. 

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा बीड जिल्हा अध्यक्ष श्री संगमेश्वर फुटके पुढे बोलताना म्हणाले की, परळी तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कुठेही जेव्हा जेव्हा तेली समाजाला गरज असते आणि या समाजातील बांधव अडचणीत असतात तेव्हा कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब यांनी आदरणीय श्री वाल्मीकांना कराड यांच्यामार्फत अडचणी सोडवलेल्या आहेत, अनेक ठिकाणी आपल्या कार्यशैलीतून त्यांनी तेली समाज बांधवांची मदत केलेली आहे. 

परळी वैजनाथ येथे असलेल्या श्री शनी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी ही त्यांनी मोठी मदत केलेली असून लवकरच संत संताजी जगनाडे महाराज यांचे मंदिर परळीत उभारण्यासाठी जागा आणि त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे. 

समाजाच्या तळागाळातील लोकांना मदत करण्याचा यापूर्वीचा त्यांचा अनुभव खूप चांगला असल्यामुळे आपण त्यांचे हात बळकट करूया; ज्यामुळे महाराष्ट्रात त्यांचा सन्मान वाढेल, त्यांना मोठे पद मिळेल आणि त्याचा फायदा परळीकरांना नक्कीच होईल. परळी तालुक्यात जिथे जिथे तेली समाज बांधव आहेत त्या सर्वांनी आपले मत नामदार धनंजय मुंडे यांचे घड्याळ चिन्ह असलेल्या समोरच द्यावे व त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे अशी विनंती श्री संगमेश्वर फुटके यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?