ज्ञानेश्वरी ग्रंथ हा वारकरी सांप्रदायाचा प्राण आहे-ह.भ.प. ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे
आळंदी (प्रतिनिधी)
ज्ञानेश्वरी ग्रंथ हा सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ असून हा ग्रंथ वारकरी सांप्रदायाचा प्राण आहे,असे प्रतिपादन संतवाड्.मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले.
वारकरी सांप्रदाय हा संस्कार देणारा सांप्रदाय असून महाराष्ट्रातील तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी वारकरी सांप्रदायाचा मोठा वाटा आहे असे खासदार श्री संजय जाधव (बंडु बाॅस )यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले.मी खासदार नंतर असून सर्वप्रथम वारकरी आहे.या सांप्रदायामुळेच मला जनता जनार्दनाची सेवा करण्याची प्रेरणा ,उर्जा मिळते असेही खासदार जाधव साहेब म्हणाले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा उत्साहाचे निमित्ताने ह.भ.प.हरिहर महाराज घुले लिखित स्वानंदसुख निवासी वै.जोग महाराज प्रासादिक प्रवचनमाला भाग तिसऱ्या भागाचे प्रकाशन पद्मावती मंगल कार्यालय आळंदी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.या प्रकाशन सोहळ्यास वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.श्री प्रकाश महाराज बोधले,ह.भ.प नामदेव महाराज ढवळे,ह.भ.प गोविंद महाराज गोरे,ह.भ.प.अच्युत महाराज कानसूरकर आदिंच्या उपस्थित हा प्रकाशन सोहळा पार पडला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विष्णू सेठ शिंदे कानसुरकर, प्रकाशक डॉ.राम शिंदे साहेब कानसुरकर,मुद्रक श्री अनंतराव,ह.भ.प.फड महाराज धर्मापूरीकर ,बाबु महाराज नागरगोजे, श्रीगोपाळसेठ सारडा , अविनाश केंद्रे आदिंनी प्रयत्न केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा