परळी येथील शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता
शिवलिंगाच्या नियमित साधनेतुन दुष्ट प्रवृत्ती रोखता येतात-प.पु.माता कनकेश्वरी देवीजी
परळी येथील शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता
परळी (प्रतिनिधी)
आत्मलिंगाच्या रूपाने शिवलिंगाची साधना केल्यास बाह्य प्रवृत्ती पासून संरक्षण मिळते शिवलिंगाचे साधना दिवसातून दहा मिनिटांची दोन दोन वेळा साधना करणे अनिवार्य असुन ही साधना केल्यानंतर कुठलीही तिर्थयात्रा करण्याची गरज नाही.कारण या साधनेतुन शिवत्व प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन प.पू. माता कनकेश्वरी देवीजी यांनी परळी येथे येथील हलगे गार्डन येथे सुरू असलेल्या महाशिवपुराण कथेच्या समारोपप्रसंगी केले.
परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात माता कनकेश्वरी देवीजींची शिवमहापुराण कथा मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडली.या कथेची सांगता बुधवार दि.१३ नोव्हेंबर रोजी झाली.सकाळी ९.३० ते ११.३० दरम्यान शिवमहापुराण कथा झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.माता कनकेश्वरी देवीजींच्या या शिवमहापुराण कथेचे उत्कृष्ट नियोजन आयोजक परळी येथील कै.महेशअप्पा खानापुरे यांच्या कन्या सौ.जयश्रीताई प्रभु कोरे हिंपळनेकर, लातुर व पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ शिवकथा समितीने केले होते.यासाठी मंच समिती,निवास समिती,कार्यालय समिती,बैठक व्यवस्था समिती, आरोग्य समिती,धार्मिक विधी समिती,पाणी पुरवठा स्वच्छता समिती,आरती व प्रसाद वाटप समिती अशा समित्या स्थापन करत भाविकांनी सेवा केली.या शिवमहापुराण कथेची सांगता करताना माता कनकेश्वरी देवीजी यांनी शिवपुराण कथा श्रवण केल्याने मिळणारे पुण्य यावर सविस्तर विमोचन केले.या शिवमहापुराण कथेस परळीसह महाराष्ट्रातुन भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा