परळी समाचार चा दिपावली अंक संग्रहणीय व वाचणीय-भास्करमामा चाटे

 परळी समाचार च्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन 

देव-देवतांची कथा मांडून दिपावली अंकाची परंपरा जोपासली-श्रीमती निर्मलाताई उत्तमराव विटेकर


परळी समाचार चा दिपावली अंक संग्रहणीय व वाचणीय-भास्करमामा चाटे


परळी-वैद्यनाथ (प्रतिनिधि) परळी वैजनाथ येथून गेल्या 33 वर्षापासून प्रकाशित होणार्‍या परळी समाचार च्या दीपावली अंकाचे प्रकाशन नुकतेच परळी येथील मुक्ताई लॉन्स मंगल कार्यालयाच्या सभागृहात प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्करमामा चाटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हरिश्चंद्र वंगे दादा तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सुरेशजी चौधरी, माजी नगराध्यक्ष बाजीरावभैया धर्माधिकारी, जेष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे हे उपस्थित होते. दिवाळी अंकाचे प्रकाशन हे नवनिर्वाचित सोनपेठ येथील आमदार राजेशभैय्या विटेकर यांच्या मातोश्री व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांच्या हस्ते  प्रकाशन करण्यात आले.

प्रास्ताविक संपादक आत्मलिंग शेटे यांनी केले. यावर्षी दीपावली अंकाच्या कव्हर पेजवर शेळगाव येथील महाविष्णूचे घेतले आहे. दिपावली अंकामध्ये महाविष्णुने मोहिनी रूप धारण करून भस्मासुराचा वध केला. त्यावर देखील लेख देण्यात आलेला आहे. याप्रसंगी सर्वांनी परळी समाचार चे संपादक आत्मलिंग शेटे यांचे कौतुक करून त्यांनी असाच आपल्या परिसरातील विविध स्थानिक देवस्थानाला कव्हर पेजवर स्थान दिलेले आहे, त्याबद्दल त्यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. 

यावेळी भास्करमामा चाटे, श्रीमती निर्मलाताई विटेकर, डॉ. हरिश्चंद्र वंगे, बाजीरावभैया धर्माधिकारी, सुरेशआण्णा टाक, अभयकुमार टक्कर, श्रीमती माधुरीताई मोरे सरपंच यांनी आत्मलिंग शेटे यांचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. 

यावेळी बोलतांना जेष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे यांनी देखील आपल्या भाषणात सांगितले की, सध्याच्या काळात वृत्तपत्र चालवणे ही तारेवरची कसरत आहे. तरी माझे मित्र आत्मलिंग शेटे हे गेली 33 वर्षापासून या वृत्तपत्र क्षेत्रात अग्रेसर आहेत. तसेच भास्करमामा चाटे यांनी देखील दर्जेदार दीपावली अंक काढल्याबद्दल कौतुक केले व मी नेहमी आत्मलिंग शेटे यांच्या पाठीशी राहील असे सांगितले.

या प्रकाशन सोहळयाच्या कार्यक्रमाला डॉ. शिवकांत अंदुरे, डॉ.अमोल चाटे, नायब तहसीलदार बी.एल.रुपनर साहेब, डॉ.काबरा, डॉ.कुणाल आशोक जैन, प्रा.डॉ.विनोद जगतकर, अतुल्य महाराष्ट्राचे संपादक संपादक नितीन ढाकणे,  पत्रकार प्रा.दशरथ रोडे, भगवान साकसमुद्रे, अमोल सूर्यवंशी, दत्ता शिवगण, मनोज नरवणे यांच्यासह उत्तमराव काळे,  सौ.शोभाताई चाटे, श्रीकांत चाटे, रविकांत चाटे, श्रीमती पेंटेवार, श्रीमती कुसुमताई काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राचार्य अतुल दुबे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना