सिरसाळा- बसचालक व महिला वाहकास मारहाण : गुन्हा दाखल 


सिरसाळा, प्रतिनिधी...

      गाडी आधीच भरलेली  आहे,बसण्याचा प्रयत्न करू नका, बाजूला सरका असे बस चालकाने म्हणताच सात ते आठ जणांनी मारहाण केल्याची घटना गावातील परळी-बीड मार्गावरील मुख्य चौकात बुधवारी (ता.२७) दुपारी बारा वा. दरम्यान घडली. 

   परळी आगाराची  जाणारी एमएच 20    बीएल २९२३या क्रमांकाची बस बीड कडे जात होती. या बसमध्ये आधीच ८०-८२ प्रवासी बसले होते.ही बस फुल झाल्याने बसचालक नागनाथ गित्ते,व महिला कंडक्टर रंजना कोळी यांनी  दुसऱ्या बसने या असेच सांगत असताना गर्दी जमली व बसचा दरवाजा लागत नसल्याने बस चालक खाली उतरून बाजूला सरका असे म्हणताच मुखीद शेख, आत्तार पठाण,पऱ्या अशपाक शेख, अनवर शेख व इतर आठ जणांनी बस चालक नागनाथ गीते व रंजना अभिमान कोळी यां दोघांना शिवीगाळ, धक्काबुक्की,करून बुक्क्याने मारहाण केल्याचे,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी  फिर्याद सिरसाळा पोलिसात नोंद केली आहे. या घटनेनंतर बस चालक गित्ते यांना हार्टअटॅक आल्याचे सांगण्यात आले असून खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. याप्रकरणी तपास स.पो.नि.गोरखनाथ दहिफळे,पोलीस उपनिरीक्षक आनंद जाधव हे करत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !