लोकशाहीने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजवा: राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा - ॲड.जीवनराव देशमुख

 लोकशाहीने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजवा: राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा -ॲड.जीवनराव देशमुख

परळी वैजनाथ/प्रतिनिधी...

       लोकशाहीने दिलेला आपला मतदानाचा हक्क जरुर बजवा परळी विधानसभा मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा  असे आवाहन रा.काॅ.शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड.जीवनराव देशमुख यांनी केले आहे.

          233- परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना प्रचारात सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.यावेळी मतदार संघातील प्रश्न केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष सोडवणारा लोकप्रतिनिधी म्हणून राजेसाहेब देशमुख यांना निवडून देण्याचा निर्धार जनतेने केलेला आहे. शेती,शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार यांच्यासाठी काम करणारा जबाबदार लोकप्रतिनिधी निवडला जाणे गरजेचे आहे. त्यासाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी राजेसाहेब देशमुख यांना  प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन रा.काॅ. शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड.जीवनराव देशमुख यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !