युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

अतिशय दुर्देवी व खळबळजनक घटना !

परभणी जिल्हा हादरला : शिक्षकाने कुटुंबासह रेल्वेमार्गावर संपवले जीवन


गंगाखेड : गंगाखेड रेल्वे स्थानका जवळ असलेल्या धारखेड शिवारात रेल्वे पुलाजवळ शिक्षकाने आपल्‍या पत्‍नी व मुलीसह जीवन संपवल्‍याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मसनाजी सुभाष तुडमे (रा.किनी कद्दू तालुका अहमदपूर जिल्हा लातूर) सध्या मुक्काम गंगाखेड असे त्‍यांचे नाव आहे. ते सध्या शहरातील एका खाजगी विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. मसनाजी तुडमे त्‍यांची पत्नी व मुलगी या कुटुंबीयांतील तिघांनी रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या परभणी रेल्वे मार्गावर आत्‍महत्‍या केली. धारखेड शिवारातील रेल्वे पटरीवर ही घडल्‍याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान कुटुंबीयांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.

घटनेची माहिती मिळतात उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक असेफ शेख जमादार दीपक वावळे व गंगाखेड पोलिसांनी घटनास्थळावर घेतली असून मृतदेह ताब्यात घेतले. मयत मसनाजी तुडमे यांच्या खिशात असलेला मोबाईल वरून नातेवाईकांना संपर्क करत सदर इसमाची ओळख पटवली सदर घटना दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली. रेल्वे मालगाडी येत असताना रेल्वे पटरीवर तिघांनी झोपून आत्महत्या केली असल्याचे प्रत्‍यक्षदर्शीनी सांगितले. याबाबत घटनास्थळावर हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या