जिल्ह्याच्या विकासाचा सूर्य मावळू देऊ नका -पंकजा मुंडे

जिल्ह्याच्या विकासाचा सूर्य मावळू देऊ नका -पंकजा मुंडे 

अंबाजोगाई।दिनांक १२।

माझा जिल्हा पुरोगामी, सुशिक्षित आणि चांगल्या माणसाच्या पाठिशी उभा राहणारा जिल्हा आहे. त्यामुळे या निवडणूकीत तुम्हाला विकासाची दृष्टी समोर ठेवून मतदान करायचे आहे. जिल्हयाच्या विकासाचा सूर्य कधीच मावळू देऊ नका असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे यांनी केलं.

        अंबाजोगाईत आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व आ. पंकजा मुंडे यांची संयुक्त सभा झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी खासदार डॉ.प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

  अंबाजोगाईची मी नात असल्याने या शहराशी माझा ऋणानुबंध आहे. हा जिल्हा मुंडे-महाजनांच्या तालमीत वाढलेला जिल्हा आहे. मुंडे साहेबानी एकेक माणूस जोडून ठेवला आहे. या जिल्ह्याने १९८० पासून कमळाचं फुल सोडलेलं नाही. पालकमंत्री असतांना जिल्हयासाठी खूप चांगल काम केल. सर्व घटकांचा समान विकास करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत माझा पराभव झाला पण तो पराभव मी आता विसरले आहे. मी मतांनी हरले पण मनाने हरले नाही आणि पुन्हा कामाला लागले. मी महाराष्ट्रातचं रहाव, दिल्लीत जावू नये अशी तुमचीच इच्छा होती म्हणून विधानपरिषदेची आमदार झाले.मी आता कोण्या एका मतदारसंघाची आमदार नाही तर पूर्ण जिल्हयाची आमदार आहे, त्यामुळे आता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहे.

विकासाचा सूर्य मावळू देऊ नका

महाराष्ट्रात पुन्हा भाजपा महायुतीचे सरकार सत्तेवर आले  तरच जिल्ह्याचा विकास साधता येईल. फेक नरेटिव्ह पूर्णपणे नेस्तनाबूत करा.विकासाचा सूर्य कधीच मावळू देऊ नका,  असं आवाहन आ. पंकजाताईंनी यावेळी केलं.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?