निवडणूक आखाड्यात धनंजय मुंडेंच्या 'खेळ्या' यशस्वी !

पहिला पडाव:परळी मतदारसंघात सर्व बाबी वजा अन् सरस बेरजेचे राजकारण :धनंजय मुंडे यांची यशस्वी निवडणूक रणनिती!

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
       संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या विद्यमान कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदार संघाकडे वजनदार राजकीय नेत्यांनी विशेष लक्ष घालून या मतदारसंघाची निवडणूक आणखीनच लक्षवेधी केलेली आहे. धनंजय मुंडे यांचा वारू रोखण्यासाठी राजकारणातील अनेक डाव -प्रति डाव, खेळ्या आणि रणनीतीने गेले काही दिवस बहरून गेलेले दिसले. मात्र परळी मतदारसंघाची संपूर्ण नाडी माहीत असलेल्या धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच संयम ठेवत अतिशय चानाक्षपणाने त्यांची एक- एक खेळी खेळल्याचे दिसून येते. निवडणुकीचा महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या अर्ज मागे घेण्याच्या दिवशी त्यांच्या या खेळ्यांना यश आल्याचेही दिसते. एकंदरीतच धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघाच्या निवडणूक राजकारणात बाकी सगळ्याच गोष्टी वजा करत सरसपणे बेरजेची रणनीती अंमलात आणल्याने निवडणूकीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात त्यांनी यश आपल्या बाजूने मिळवल्याची चर्चा होत आहे. 
       परळी विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून या निवडणुकीकडे महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे लक्ष लागलेले आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांना त्यांच्याच मतदारसंघात कसे रोखले जाईल यासाठीची रणनीती राजकीय पटलावर सुरू झाली. त्या रणनीतीचाच भाग म्हणून परळी मतदारसंघातील अनेक जणांना आपल्या बाजूला घेऊन धनंजय मुंडे यांच्या उमेदवारीला मोठे आव्हान उभे करण्याचे प्रयत्न झाल्याचे दिसून आले. अनेक तुल्यबळ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसले. परळी मतदार संघात अर्ज भरताना तब्बल 58 जणांनी आपले अर्ज भरले होते. छाननीनंतर दहा लोकांचे अर्ज बाद झाले. तरीही 48 उमेदवार शिल्लक राहिले होते.

       परळी मतदारसंघातील संपूर्ण मतांची आकडेवारी, मत विभागणी, विशिष्ट व्यक्ती विशेष मुद्दे, पॉकेट वोटिंग, जातीनिहाय वोटिंग, काही प्रमाणातील ॲण्टीकम्बल्सी  या सर्व बाबींचा विचार करता मोठ्या प्रमाणावर निवडणुकीत उमेदवारांची संख्या राहणे हे एकगठ्ठा मतदान मिळवण्यासाठी  एक प्रकारे घातकच ठरले असते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनपेक्षितपणाने तब्बल 35 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. तर केवळ अकराच उमेदवार निवडणुकीच्या प्रत्यक्ष रिंगणात अंतिमतः उतरल्याचे चित्र दिसत आहे. प्रत्यक्ष लढतीचा विचार केला तर धनंजय मुंडे यांची थेट लढत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्याशी होणार आहे. अनेकांनी अनेक कारणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्याच पद्धतीने अनेकांनी अनेक कारणांनी आपले उमेदवारी अर्जही मागे घेतले आहेत. मात्र प्राथमिक दृष्ट्या सरळ सरळ लढत ही धनंजय मुंडे यांच्या बेरजेच्या राजकारणाला पूरक अशा प्रकारची असल्याची चर्चा नागरिकात होत आहे. त्यामुळे निवडणुकीचा महत्त्वपूर्ण पडाव असलेल्या उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणाने धनंजय मुंडे यांच्याकडून आखण्यात आलेली रणनीती व निवडणुकीच्या आखाड्यात राजकीय अनुभवाचा पुरेपूर कस लावून खेळण्यात आलेल्या खेड्या आजतरी यशस्वीच झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?