इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

परळीत भक्तीपर्वणी:जय्यत तयारी,भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

परळीत ६ तारखेपासून प.पु. माता कनकेश्वरी देवीजींची शिवमहापुराण कथा

हालगे गार्डन येथे जय्यत तयारी,भाविकांनी उपस्थित राहण्याचे कोरे परिवाराचे आवाहन

परळी (प्रतिनिधी)

 देश,विदेशात सहाशे पेक्षा अधिक रामकथा,श्रीमद् भागवत कथा,देवी भागवत कथा,शिव महापुराण आपल्या सुमधुर वाणीतुन सांगणार्या श्री श्री 1008 महामंडलेश्वर प.पु.माता कनकेश्वरी देवीजींच्या बुधवार दि.६ नोव्हेंबर पासून परळी येथे शिवपुराण कथा ज्ञान यज्ञास प्रारंभ होत असून या कथेस भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सौ.जयश्री प्रभु कोरे परिवार हिंपळनेकर व पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ शिवकथा समिती,परळी वैजनाथ यांनी केले आहे.वतीने करण्यात आले आहे.

   परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत आयोजित शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात माता कनकेश्वरी देवीजींची शिवमहापुराण कथा होणार आहे.या महाकथेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.यासाठी मंच समिती,निवास समिती,कार्यालय समिती,बैठक व्यवस्था समिती, आरोग्य समिती, धार्मिक विधी समिती,पाणी पुरवठा स्वच्छता समिती,आरती व प्रसाद वाटप समिती अशा समित्या जाहीर करण्यात आल्या आहेत.माता कनकेश्वरी देवीजींच्या या शिवमहापुराण कथेचे आयोजक परळी येथील कै.महेशअप्पा खानापुरे यांच्या कन्या सौ.जयश्रीताई प्रभु कोरे हिंपळनेकर, लातुर या असुन माता कनकेश्वरी देवीजींची २८ वर्षानंतर दुसर्यांदा परळी येथे कथा होत आहे.या कथेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोरे परिवार व पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ शिवकथा समिती,परळी वैजनाथ यांनी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!