घाटनांदुर येथे गोंधळानंतर मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू जिल्हाधिकारी यांनी दिली माहिती
परळी मतदारसंघात आत्तापर्यंत 52.41 टक्के मतदान
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... परळी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक विभागाचे अधिकृत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 52.41% इतके मतदान झाले आहे मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत सुरू असून घाटनांदुर येथे झालेल्या गोंधळानंतर थांबवण्यात आलेले मतदान पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिली आहे
विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आज सकाळपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी तीन वाजेपर्यंत परळी मतदारसंघात 52.41 टक्के मतदान झाले आहे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात सकाळपासून अतिशय शांततेने मतदानाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे त्याचप्रमाणे सकाळच्या टप्प्यामध्ये मोठ्या संख्येने मतदारांनी प्रतिसाद देत रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे दुपारी एक वाजेपर्यंत चा निवडणूक विभागाच्या अधिकृत अहवाल निवडणूक विभागाला सादर करण्यात आला असून दुपारी एक पर्यंत परळी मतदारसंघात 36.23% इतके मतदान झाले होते. आत्ता तीन वाजेपर्यंत परळी विधानसभा मतदारसंघाची मतदानाची गती पाहता हे मतदान 52.41झाले आहे एकंदरीतच मतदानाच्या प्रक्रियेत मतदारांची चांगली गती दिसून येत आहे.
दरम्यान मतदारसंघात काही ठिकाणी मतदान केंद्रांवर तांत्रिक बाबी वगळता घाटनांदुर येथे झालेल्या मशीन तोडफोड प्रकरणानंतर या ठिकाणची मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती मात्र प्रशासनाने ही मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू केलेले आहे गोंधळ होण्यापूर्वी ज्या मतदारांनी मतदान केले ते मतदान सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा