राष्ट्रवादीकडून एक आणि भाजपकडून एक:बीड जिल्ह्य़ाला मिळणार दोन मंत्रीपदं

 बीड जिल्ह्य़ाला दोन मंत्रीपदं: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री: पंकजा मुंडे मंत्रिमंडळात फिक्स !


भाजपच्या मुख्यमंत्री शपथविधीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर 2 तारखेला भाजप महायुतीचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. भाजप महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना पत्ता कट होण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही दोन्ही पदं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहण्याची शक्यता आहे. महायुती भाजपाच्या मंत्रिमंडळात यंदा या नेत्यांना मंत्रिपदावरून पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
           विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. सत्ता स्थापनेसाठी आता राज्यात हालचालींना वेग आला आहे. आज मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच महायुतीमधील  तिन्ही पक्षांचे नेते आज दिल्लीत जाणार आहेत. दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. मुख्यमंत्रि‍पदाचे आज नाव जाहीर होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या माघारीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, आज सायंकाळपर्यंत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार?
भाजपकडून साधारणतः पाच आमदारांच्या मागे एक मंत्रिपद हे सूत्र निश्चित केले जाऊ शकते. तसे झाले तर भाजपच्या वाट्याला २५, शिवसेनेला १०; तर अजित पवार यांना ८ मंत्रिपदे मिळू शकतात. खातेवाटपात नगरविकास खाते शिवसेनेकडे; तर वित्त आणि नियोजन खाते अजित पवार यांच्याकडे जाऊ शकते.

देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांची पसंती
गिरीश महाजन - सरकारचे संकटमोचक म्हणून चेहरा, सोबतच उत्तर महाराष्ट्रात भाजपला चांगलं यश लोकसभा आणि विधानसभेत मिळवून दिलंय 
पंकजा मुंडे - ओबीसी आणि मराठवाड्यातील भाजपचा मातब्बर चेहरा 
रविंद्र चव्हाण - पडद्यामागून काम करणारे व्यक्तीमत्व, भाजपला कोकणातील जागा मिळवून देण्यात चव्हाण यांचा मोठा वाटा 
मंगलप्रभात लोढा - मुंबई शहरातून भाजपचा मोठा चेहरा आणि पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं गुजराती, जैन समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाची व्यक्ती 
चंद्रशेखर बावनकुळे - विधानसभेत मोठं यश मिळवून दिल्याने पुन्हा एकदा वर्णीची शक्यता 
आशिष शेलार - मुंबई अध्यक्षाच्या दृष्टीनं निवडणुकीत चांगली कामगिरी, सोबतच, कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है संदर्भातलं धोरण राबवलं, आणि नोमानीचा व्हीडिओ समोर आणला, अशात पुन्हा मंत्रीपदाची शक्यता
नितेश राणे - हिंदूत्व पोस्टर बाॅय म्हणून राणेंची ओळख, भाजपसाठी हिंदुत्वाचा चेहरा, कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ है चा नारा पुढे नेण्यात मोठं काम 
शिवेंद्रसिंहराजे भोसले - पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा, मोठ्या लीडनं शिवेंद्रराजेंचा विजय, भोसले घराण्याचा चेहरा 
राहुल कुल - दौंडमधून तिसऱ्या विजयी, राष्ट्रवादी कांग्रेसला सुरुंग लावत पुन्हा आमदार 
माधुरी मिसाळ - 2009 पासून पर्वती मतदारसंघातून आमदार, पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं मंत्रीपदाची शक्यता 
संजय कुटे - पश्चिम विदर्भातील भाजपचा चेहरा, फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख, सोबतच पडद्यामागून पक्ष करणारे आणि संघाच्या फळीतील चेहरा 
राधाकृष्ण विखे पाटील - नगर जिल्ह्यातील चेहरा आणि भाजपातील ज्येष्ठ चेहरा 
गणेश नाईक - नवी मुंबईतील भाजपचा मोठा चेहरा, यंदा विजय झाल्याने संधी मिळण्याची शक्यता 
गोपीचंद पडळकर - जतमधून आमदार, राम शिंदे हरल्याने रोहित पवारांविरोधात ताकद उभी करत शह देण्याचे प्रयत्न होऊ शकतात, धनगर चेहरा 

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
गिरीश महाजन
पंकजा मुंडे
चंद्रशेखर बावनकुळे
रविंद्र चव्हाण
मंगलप्रभात लोढा
आशिष शेलार
शिवेंद्रसिंहराजे भोसले
नितेश राणे
राहुल कुल
माधुरी मिसाळ
संजय कुटे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
गोपीचंद पडळकर
चंद्रकांत पाटील
गणेश नाईक
प्रवीण दरेकर
अतुल भातखळकर
देवयानी फरांदे


शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी
उदय सामंत
शंभूराज देसाई
गुलाबराव पाटील
संजय शिरसाट
भरत गोगावले
प्रकाश सुर्वे
प्रताप सरनाईक
तानाजी सावंत
राजेश क्षीरसागर
आशिष जैस्वाल
निलेश राणे
राष्ट्रवादी संभाव्य मंत्र्यांची यादी

अजित पवार
धनंजय मुंडे
छगन भुजबळ
अदिती तटकरे
दिलीप वळसे पाटील
अनिल पाटील
हसन मुश्रीफ
धर्मराव बाबा अत्राम
संजय बनसोडे
नरहरी झिरवळ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना