महेशदादा लांडगे विजयाची हॅटट्रिक नक्की करतील

आ. पंकजा मुंडेंनी भोसरीची सभा धडाकेबाज भाषणाने गाजवली

महायुती सरकारचा विकास प्रत्यक्ष दिसणारा ; आघाडीने मात्र जनतेला झुलवत ठेवले 


महेशदादा लांडगे विजयाची हॅटट्रिक नक्की करतील


भोसरी (पुणे) ।दिनांक ०७।

राज्यातील भाजपा महायुती सरकारने केलेला विकास 'हा सूर्य, हा जयद्रथ' असा प्रत्यक्ष समोरासमोर दिसणारा आहे. महाविकास आघाडीने मात्र जनतेला केवळ झुलवत ठेवण्याचे काम केले, त्यामुळे या निवडणुकीत भाजपा महायुतीलाच आपली पसंती देऊन पुन्हा एकदा सत्तेवर आणा असं आवाहन  भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी केले. ही सभा पंकजाताईंनी आपल्या धडाकेबाज आणि आक्रमक भाषणाने गाजवली. सभेला त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विराट जनसमुदाय उपस्थित होता.


भोसरी (पुणे) विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार महेश दादा लांडगे यांच्या प्रचारार्थ दिघी येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर उमेदवार महेश दादा लांडगे, आ. उमाताई खापरे, आ. अमित गोरखे, सदाशिव खाडे तसेच भाजपा महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.


महाविकास आघाडीकडे कोणताही मुद्दा, संकल्प राहिलेला नाही. लोकांना केवळ झुलविण्याचे काम त्यांनी केले, त्यांचा विकास फक्त हवेत झाला. पण आम्ही विविध योजनेच्या माध्यमातून जनतेच्या खिशात थेट पैसा दिला, रस्ते केले, शहर व ग्रामीण भागात विकासाच्या योजना पोहोचवल्या  'हा सूर्य हा जयद्रथ' असा समोरासमोर दिसणारा विकास केला असं पंकजाताई म्हणाल्या.

याला पाडा, त्याला गाडा ही कुठली संस्कृती ?

------

“याला पाडा, त्याला गाडा ही कुठली संस्कृती? असा सवाल आ. पंकजाताई यावेळी केला. कुणीही कडुलिंब, बाभळीला नाही तर आंब्याच्याच झाडाला दगडे मारतात. पैलवानाने व्यथित होऊन नाही तर बलवान होऊन राजकारण करायचे आहे. बल बुद्धी आणि विद्या हे सर्व काही एका पैलवानाकडेच असते. असा गैरसमज आहे की पैलवानाला फक्त भावना कळतात नव्हे, तर पैलवान कोणत्या वेळेला शरीराचा कोणता स्नायू वापरून शत्रूला चितपट करायचे हे ठरवत असतो. म्हणून आमदार महेश लांडगे  राजकीय पैलवान होऊन टीकेला उत्तर न देता केलेले काम दाखवत आहेत. त्यामुळे विरोधक चितपट झाल्याशिवाय राहणार नाहीत, असेही मुंडे म्हणाल्या.


”अरे जो काम करतो त्याला निवडून आणण्याचा सर्वस्वी अधिकार नागरिकांचा आहे”. काम करणाऱ्या माणसाला राजकारणात टिकून ठेवण्याची जबाबदारी जनतेची नाही का? असे सवालही त्यांनी यावेळी नागरिकांना उद्देशून केला. राज्यघटना भवन, न्यायालय संकुल, संतपीठ यांसारखी कामे करून नागरिकांच्या हृदयात महेश लांडगे यांनी स्थान मिळवले आहे. कार्यकर्त्यांनी नागरिकांना या कामाची आठवण करून देणे गरजेचे आहे. जे काम महेश लांडगे यांनी केलेले आहे. या विकासाच्या कामावरच यंदा त्यांची हॅट्रिक निश्चित आहे, असा विश्वास पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार