निधन वार्ता: संभाजी मुंडे यांचे निधन

 निधन वार्ता: संभाजी मुंडे यांचे निधन 


परळी वै. ता.५ प्रतिनिधी 

       शहरातील अयोध्या नगर येथील संभाजी पाटलोबा मुंडे (वय-७०) यांचे सोमवारी (ता.४) रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास ऱ्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले. 

     औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचारी संभाजी पाटलोबा मुंडे (एस पी मुंडे) कर्मचारी महासंघाचे केंद्रीय कमेटी सदस्य होते. त्यांनी विज निर्मिती केंद्रातील कर्मचारी वर्गासाठी भरीव काम केले आहे. त्यांचा धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावर होता. त्यांनी त्यांच्या पत्नीला पंचायत समितीवर १९९२ साली निवडुण आणले होते. संभाजी मुंडे यांच्या पार्थिवावर  मंगळवारी (ता.५) सकाळी ९:०० वाजता परळी येथील सार्वजनिक स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राख सावडण्याचा विधी बुधवारी सकाळी ७:३० आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !