ओम नमो शिवायच्या भजनाने हालगे गार्डन परिसर भक्तीमय

 शरीराचे विसर्जन हा अधिकार असुन त्याचा आनंद घेणे हा हक्क आहे- माता कनकेश्वरी देवीजी

ओम नमो शिवायच्या भजनाने हालगे गार्डन परिसर भक्तीमय

परळी (प्रतिनिधी)

 भगवान शंकराची पूजा व भक्ती कधीही करता येते यासाठी कुठल्याही वेळेचे बंधन नसून शिव हे ज्ञान व वैराग्याचे रूप आहे मनुष्याच्या शरीराचे विसर्जन हा अधिकार असून त्याचा आनंद घेणे हा हक्क आहे माणसाचे शरीर हेच एक शिवलिंग असल्याचे प्रतिपादन माता कनकेश्वरी देवीजी यांनी परळी येथे केले.

  पंचम ज्योतिर्लिंग परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात रविवार दि.१० नोव्हेंबर रोजी माता कनकेश्वरी देवीजी कथेचे पाचवे पुष्प गुंफताना भगवान शंकराची भक्ती कशी करावी यावर सविस्तर विमोचन केले.अन्य देवांच्या मुर्तींची स्थापना करण्यासाठी प्राणप्रतिष्ठा मंत्रांची गरज असते तर शिवलिंग स्थापित करण्यासाठी फक्त ओमकार उच्चारण करत शिवलिंग स्थापित करता येते.ज्या गावात शिवलिंग नाही तेथे स्मशानाला शिवलिंग मानावे.कारण शिव ज्ञान, वैराग्य स्वरूप आहे असे सांगून शिवलिंगाचे अनेक प्रकार सांगितले.यातील सर्वात महत्त्वाचे शिवलिंग हे गुरुलिंग आहे जे गुरु द्वारा स्थापित होते.गुरुलिंगात चरलिंग,रसलिंग,स्थापित लिंग आहे. 

जेवढे दगड आहेत त्यात शिवाचा वास असल्याने जितने कंकर उतने शंकर असे भगवान शंकराला संबोधले जाते.शिवलिंगामध्ये वास्तुदोष दूर करण्यासाठी नर्मदेश्वरांची भक्ती आवश्यक आहे.शिवालयात कधीही पुजा केली जाऊ शकते.स्पटीक शिवलिंगाची पुजा मात्र महिलांसाठी विशेष आहे. परिवारातील सर्वांसाठी,पतीच्या आयुष्यासाठी,आयुष्याच्या सुखासाठी ही पुजा करावी.प्रथम पार्थिव लिंगाची पुजा आवश्यक आहे.माता,पिता, गाय,प्राण्यांच्या पुजेनंतरच शिवपुजा मान्य आहे.परमार्थ पार्थिव पुजा आहे.माती,भस्म,गोमूत्र यापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करता येते.आपले मन,शरीर हे देखील शिवलिंगच आहे कारण शरीर हे पंचतत्वापासुन बनलेले आहे.शरीराचे विसर्जन हा अधिकार आहे.त्याचा आनंद घेणे हा देखील हक्क आहे.यासाठीच पार्थिव पुजा मदतगार असल्याचे सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !