परळीला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी मला मतदानरुपी आशीर्वाद द्या- राजेसाहेब देशमुख

जुने रेल्वे स्टेशनच्या कॉर्नर बैठकीस उस्फूर्त प्रतिसाद

परळी,(प्रतिनिधी):-परळी शहरात कोट्यावधी रुपयाचा निधी आला, गेला कुठं? आज परळी शहराची अवस्था काय? झाली आहे. परळी शहरासह विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी परळीला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी मला मतदानरुपी आशीर्वाद द्या मी सेवक म्हणून काम करणार असल्याचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख जुने रेल्वे स्टेशन येथील कॉर्नर बैठकीत म्हणाले. या बैठकीस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या भागातील नागरिकांशी संवाद साधत त्यांनी विकासाचा विचार त्यांच्यासमोर मांडला. या वेळी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.


         या प्रसंगी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, जेष्ठ नेते राजेश देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष बहादुरभाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी शहराध्यक्ष ऍड.जीवनराव बदरभाई, विश्वनाथ गायकवाड, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नारायण सातपुते, आदीसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   परळी मतदारसंघातील परळी वैजनाथ जुना रेल्वे स्टेशन येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मतदार बंधू भगिनींच्या भेटीगाठी घेतल्या. २० नोव्हेंबर रोजी मतपेटीवरील अनुक्रमांक ३ ‘तुतारी वाजवणारा माणूस’ चिन्हा समोरील बटन दाबून मतदानरुपी आशीर्वाद द्यावा. शरद पवार साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन परळीला यशाच्या शिखरावर नेण्याचा निर्धार असून निवडणुकीत आशीर्वाद आणि सहकार्य अपेक्षित असल्याचं महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख म्हणाले. या कॉर्नर बैठकीस जुने रेल्वे स्टेशन परिसरातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार