भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन!

श्रीगुरु संत सोपानकाका उखळीकर यांच्या ७७ व्या पुण्यतिथी निमित्त आज परळीत एक दिवसीय कीर्तन महोत्सव

परळी वै.  प्रतिनिधी....
        श्री गुरु संत सोपानकाका महाराजांचा समाधी सोहळा आज मिती कार्तिक शु.४ मंगळवार, दि.०५/११/२०२४ रोजी असुन त्यानिमित्त परळीत एक दिवसीय कीर्तन महोत्सव  आयोजित करण्यात आला आहे.भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
     श्री संत सोपानकाका महाराज मंदिर (उखळीकर भजनी फड), परळी वैजनाथ जि. बीड येथे आज मिती कार्तिक शु.४ मंगळवार, दि.०५/११/२०२४ रोजी पुण्यतिथी सोहळा साजरा होणार आहे. त्यानिमित्त श्री. संत जगमित्रनागा मंदिर येथे स. १० ते १२ पुजेचे कीर्तन श्री.ह.भ.प. बालासाहेब महाराज उखळीकर यांचे होईल. व श्री संत सोपानकाका मंदिर येथे दु. १ ते ३ या वेळेत श्री.ह.भ.प. जयवंत महाराज बोधले, पंढरपुर यांचे कीर्तन होईल व तद्नंतर महाप्रसाद होईल. तसेच रात्रौ . ८ ते १०श्री.ह.भ.प. किशन महाराज पवार (अध्यक्ष, मुकुंदराज संस्थान, अंबाजोगाई) यांचे कीर्तन होईल. या सोहळ्यास पुरुषोत्तम श्रीधर नाना महाराज उत्तरेश्वर पिंप्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील फडावरील महाराज मंडळी व गायक, वादक, श्रोते मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी भाविकांनी किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त उखळीकर महाराज मंडळ, परळी वैजनाथ व उखळीकर फडावरील भाविक भक्त यांनी केले आहे.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !