परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

भव्य ग्रंथदिंडीने हालगे गार्डन येथे श्री शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञास प्रारंभ

 शिष्यांची क्षमता ओळखून उपदेश करणारेच खरे गुरु -प.पु.कनकेश्वरी देवीजी

भव्य ग्रंथदिंडीने हालगे गार्डन येथे श्री शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञास प्रारंभ

परळी (प्रतिनिधी)

समोर बसलेल्या शिष्यवृंदाची मानसिकता, ऐकण्याची व आचरण करण्याची क्षमता ओळखून त्या शिष्यांना समजेल असे ज्ञान देणारेच खरे गुरु असुन अशा गुरु कडून मिळालेल्या ज्ञानातुन नम्र शिष्य घडत असतात असे प्रतिपादन श्री श्री 1008 महामंडलेश्वर प.पु.माता कनकेश्वरी देवीजींनी केले.परळी येथील हालगे गार्डन येथे येथे माताजींच्या श्री शिवमहापुराण कथेस बुधवार दि.६ नोव्हेंबर पासून उत्साहात प्रारंभ झाला.

 परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत आयोजित शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात माता कनकेश्वरी देवीजींची शिवमहापुराण कथा होत आहे.या कथेचे पहिले पुष्प आपल्या सुमधुर वाणीतुन व संगीताच्या साथीने गुंफताना माता कनकेश्वरी देवीजी यांनी गुरु शिष्यामध्ये नाते कसे असावे हे सविस्तरपणे सांगितले.मजबुरीत माणसाच्या अंगी असलेली विनम्रता ही खरी विनम्रता नसुन यशाच्या शिखरावर पोहचल्यानंतरही जो माणुस लहानथोरांशी आपले विनम्रपणाचे वागणे कायम ठेवतो तोच खरा विनम्र व्यक्ती होय असे सांगुन शिवमहिमेवर सविस्तर विमोचन मांडले.पहिल्याच दिवशी कथामंडप भाविकांच्या उपस्थितीने भरुन गेला होता. 


@@@@@

 भव्य ग्रंथदिंडीने कथेस प्रारंभ

 प.पु.माता कनकेश्वरी देवीजींची श्री शिवमहापुराण कथेस प्रारंभ होण्यापूर्वी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ मंदिर येथुन शेकडो महिला भाविकांनी भव्य ग्रंथदिंडी काढल्यानंतर कथास्थळ हालगे गार्डन येथे आल्यानंतर कथेस प्रारंभ झाला. या ग्रंथदिंडीचे नियोजन आयोजक सौ.जयश्रीताई प्रभु कोरे हिंपळनेकर,लातुर व पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ शिवकथा समिती,परळी वैजनाथ यांनी केले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!