परळीच्या शिरपेचात मानाचा तुरा

डॉ.रेणुका भिमाशंकर फुटके हीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इन्सुरंस मेडिकल आँफीसर ग्रुप ए मध्ये महाराष्ट्रात प्रथम


परळीच्या शिरपेचात मानाचा तुरा

परळी वैजनाथ दि.११ (प्रतिनिधी)

             शहरातील शास्त्रीनगर भागातील रहिवासी भिमाशंकर फुटके यांची कन्या डॉ रेणुका भीमाशंकर फुटके महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इन्सुरंस मेडिकल आँफीसर ग्रुप ए मध्ये  महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान पटकावत परळीचा शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

             शहरातील शास्त्रीनगर भागातील सेवानिवृत्त शिक्षक भिमाशंकर फुटके व आशा फुटके यांची कन्या  डॉ रेणुका भीमाशंकर फुटके महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इन्सुरंस मेडिकल आँफीसर ग्रुप ए मध्ये ओबीसीतून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. डॉ रेणुचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शहरातील न्यु हायस्कूल मध्ये तर उच्च माध्यमिक शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर तर वैद्यकीय शिक्षण मुंबई येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण झाले. यानंतर डॉ रेणुकाने मुंबई येथे प्रँक्टीस करत २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इन्सुरंस मेडिकल आँफीसर ग्रुप ए ची परिक्षा दिली होती. यापरिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परिक्षेत महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

भिमाशंकर फुटके यांच्या चारही मुली उच्च शिक्षीत

  श्री. फुटके यांनी आपल्या चारही मुलींना उच्चशिक्षण दिले आहे. सोनम शिक्षीका, मिनाक्षी आयआयटी मधून पिएचडीकरुन बेंगलोर येथे नौकरी करत आहे, मेघा कँनरा बँकेत शाखाधिकारी, डॉ. रेणूका एमबीबीएस डॉक्टर नंतर आता मेडिकल आँफीसर बनली आहे.

---------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?