शरदचंद्र पवार यांचा राजेभाऊ फड यांना ऊर्जादायी शब्द

 राजेभाऊ तू काळजी करू नको, मी आहे....

शरदचंद्र पवार यांचा राजेभाऊ फड यांना ऊर्जादायी शब्द

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ परळी वैजनाथ येथे भव्य जाहीर सभा घेतली. परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेने या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारच्या सुमारास त्यांचं परळीत आगमन झालं. यावेळी युवक नेते राजेभाऊ फड यांनी हेलिपॅडवर उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले. यावेळी शरदचंद्र पवार यांनी राजेभाऊ फड यांचा हात पकडत म्हटले की, "राजेभाऊ तू संघर्ष करत रहा, काळजी करू नकोस मी आहे..." असा विश्वास दिला.


देशाचे नेते, जाणते राजे शरदचंद्र पवार महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ परळी वैजनाथ शहरात आले होते. त्यांचे युवक नेते राजेभाऊ फड यांनी स्वतः हेलिपॅडवर उपस्थित राहून प्रभू वैद्यनाथ यांच्या पावन भूमीत स्वागत केले. यावेळी पवार साहेबांनी थोड्याच शब्दांत मोठी ऊर्जा दिली आणि मार्गदर्शन केले. ते मला म्हणाले... "राजेभाऊ तुमच्यासारख्या तरुण तडफदार नेतृत्वाची आजच्या समाजाला गरज आहे. काम करत रहा ही जनता जनार्दन तुम्हाला नक्कीच एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवेल. निष्ठेला आणि कामाला निश्चित फळ मिळत असते. तुम्ही लोकांच्यासाठी संघर्ष करत रहा, लोकसेवा करत रहा मी तुमच्या पाठीशी मोठी ताकद लावणार आहे. भविष्यात लवकरच तुमच्यावर एक मोठी जबाबदारी मी टाकून लोकांच्या सेवेसाठी तुम्हाला मी मैदानात उतरवणार आहे." साहेबांच्या या शब्दांमुळे मला आता कसलीही काळजी उरलेली नसून मी त्यांचा विचार तळागाळातील जनतेपर्यंत नेण्यासाठी सदैव कार्यरत राहीन असे राजेभाऊ फड मध्यम प्रतिनिधींशी बोलतांना म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?