समन्वयाचा आभाव.....राजेसाहेबांना भोवणार!

शरद पवारांच्या सभेआधीच परळीच्या महाविकास आघाडीतील  बेबनाव चव्हाटय़ावर !


शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचाच फोटो नाही :विचारत न घेताच टाकले शिवसेना(उबाठा) पदाधिकाऱ्यांचे फोटो

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
   परळी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची परळी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. परळी मतदारसंघात महाविकास आघाडीत ताळमेळ नसल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत.याच अनुषंगाने आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येही सगळा आवमेळ असल्याचे दिसून येत आहे. नेमकं शरद पवार सभेला येण्याआधीच परळीच्या महाविकास आघाडीतील बेबनावर चव्हाटय़ावर आल्याचे दिसून येत आहे.
       परळी वैजनाथ येथे आज दि. नऊ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता मोंढा मार्केट येथे शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अगोदरच ताळमेळ नाही. यातच शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यांची सभा या मतदारसंघाला मिळाली मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मोट बांधण्यात समन्वयाचा मोठा अभाव असल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत आम्हाला विचारात घेतले जात नाही. त्याचबरोबर या सभेच्या प्रसिद्धी पत्रकांमध्ये हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो घेण्यात आलेला नाही. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुखांचाही फोटो नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्या कोण्या पदाधिकाऱ्यांचे फोटो टाकण्यात आले आहेत ते पण त्यांना न विचारता टाकण्यात आल्याचे उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी फेसबुक पोस्ट करून जाहीर केले आहे. दरम्यान एकंदरीतच शरद पवार परळीत येण्याच्या आधीच महाविकास आघाडीतील नाराजी नाट्य आणि बेबनाव यामुळे चव्हाट्यावरच आल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांकडून फेसबुकवर पोस्ट टाकून नाराजी



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?