उजनी, जोडवाडी, दरडवाडी, कातकरवाडी, मुरकुटवाडी,कांगणेवाडी, खापरटोन, सौंदाना, भतानवाडी, बाबळगाव, सोमनवाडीत प्रचारफेरी
राजेसाहेब देशमुख यांच्या ठिकठिकाणीच्या प्रचार फेरीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सालगडी म्हणून सेवा करण्याची संधी द्या- राजेसाहेब देशमुख
उजनी, जोडवाडी, दरडवाडी, कातकरवाडी, मुरकुटवाडी, कांगणेवाडी, खापरटोन, सौंदाना, भतानवाडी, बाबळगाव, सोमनवाडीत प्रचारफेरी
परळी वै/अंबाजोगाई (प्रतिनिधी) - परळी विधानसभा मतदार संघात कृषिमंत्र्यांनी केवळ ठराविक लोकांचा विकास केला आहे. या मतदारसंघातील कारखाने व इतर उद्योग बंद पाडून बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. युवकांच्या हाताला काम नाही. त्यांच्या या धोरणामुळे परळी विधानसभा मतदारसंघ दहा वर्ष विकासापासून मागे लोटला गेला आहे. आपण मला सालगडी म्हणून सेवा करण्याची संधी द्यावी. असे आवाहन महाविकासः आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी जोडवाडी येथे मतदारसंवाद दौऱ्यात केले.
परळी विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ परळी विधानसभा मतदारसंघातील उजनी, जोडवाडी, दरडवाडी, कातकरवाडी, मुरकुटवाडी, कांगणेवाडी, खापरटोन, सौंदाना, भतानवाडी, बाबळगाव, सोमनवाडी आदी गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यानी काढलेल्या प्रचार फेरीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते ऍड. माधव आप्पा जाधव, युवा नेते सोपान तोंडे यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदारसंघात बदल हवा राजसाहेब देशमुख पर्याय नवा, आपल्या हक्काचा माणूस, सर्वसामान्य नागरिकांशी व परळी विधानसभा मतदारसंघाशी नाळ जोडलेला माणूस म्हणजे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख आहेत. आज दि.11 नोव्हेंबर 2024 रोजी उजनी, जोडवाडी, दरडवाडी, कातकरवाडी, मुरकुटवाडी, कांगणेवाडी, खापरटोन, सौंदाना, भतानवाडी, बाबळगाव, सोमनवाडी येथे काढण्यात आलेल्या ठिकठिकाणी प्रचार फेरीत वयोवृद्ध महिला, युवक मतदार आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच राजेसाहेब देशमुख यांना मताधिक्य देण्याचा निर्धार ही अनेकांनी त्यांना बोलून दाखवला. प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच अन्य मित्र पक्ष महाविकास आघाडीचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा