अज्ञात वाहनाच्या धडकेत १८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू तर दुसरा जखमी
अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू तर दुसरा जखमी
केज :- केज तालुक्यातील मस्साजोग येथे अज्ञात वाहनाने मोटार सायकलला दिलेल्या धडकेत एका अठरा वर्षाच्या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्या सोबत असलेला दुसरा युवक जखमी झाला आहे.
दिनांक २१ नोव्हेंबर रोजी रात्री ९:०० च्या सुमारास केज तालुक्यात मस्साजोग येथील तरुण बालाजी मनोहर केदार वय १८ वर्ष आणि त्याचा साथीदार उमेश केंद्रे (१८ वर्ष) हे केजहून त्यांच्या सारणी (सांगवी) या गावाकडे जात असताना मस्साजोग येथील हॉटेल
संघर्ष समोर त्यांच्या मोटार सायकलीला एका भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिली. यात बालाजी केदार याचा जागीच मृत्यू झाला .
आहे तर त्याच्या पाठीमागे बसलेला उमेश केंद्रे हा जखमी झाला आहे. अपघातात नंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह फरार झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच बिट जमादार दत्तात्रय बिक्कड हे अपघातस्थळी दाखल झाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा