युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

गणेशपार-धनगर गल्ली-बंगला-आयेशा कॉलनी- मोमदिया कॉलनी परिसरामध्ये प्रचार फेरी

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत परळी शहरात ठीक ठिकाणी उत्साहात प्रचार रॅली 

परळी शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी मतदानरूपी आशीर्वाद द्या- राजेसाहेब देशमुख



गणेशपार-धनगर गल्ली-बंगला-आयेशा कॉलनी- मोमदिया कॉलनी परिसरामध्ये प्रचार फेरी



परळी,( प्रतिनिधी):- परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना, उबाटा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ परळी शहरात दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी परळी शहरात ठीक ठिकाणी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदार बंधू भगिनींना परळी शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी मला मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मतदारांना केले. रॅलीस नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.



        राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, परळी शहर काँग्रेस चे सर्व पदाधिकारी महिला आघाडी, युवक काँग्रेस, सर्व सेल, सर्व फ्रंटचे कार्यकर्ते यांनी दि.10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वा.  महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत  गणेशपार ते धनगर गल्ली, बंगला, आयेशा कॉलनी, मोमदिया कॉलनी आदी परिसरामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली होती. रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदान रुपी आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन मतदार बंधू भगिनींना केले. 


      या रॅलीत वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त राजेश देशमुख, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बहादूर भाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी तालुकाध्यक्ष जीवनराव देशमुख, डॉ. दुष्यंत देशमुख, शशीशेखर चौधरी, कॉ. उत्तम माने, बाबा शिंदे, सय्यद फिरोज, शिवाजी देशमुख, रणजीत देशमुख, दीपक शिरसाट, सुनील मस्के, बद्दरभाई, सद्दाम शेख, रसूल खान, इतेशामा खतीब, सुभाष देशमुख, गफार शहा, वैजनाथ गडेकर, जावेद भाई, मजहर बाबा शेख, अबूतला आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीस मतदार बंधू भगिनींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या