आ. पंकजा मुंडे यांच्या उद्या किनवट, भोकर, शिरूर कासार येथे जाहीर सभा

आ.पंकजा मुंडे यांच्या उद्या किनवट, भोकर, शिरूर कासार येथे जाहीर सभा

परळी वैजनाथ।दिनांक १०।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा स्टार प्रचारक आ. पंकजाताई मुंडे यांच्या उद्या ११ नोव्हेंबर रोजी भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नांदेड व बीड जिल्ह्यात जाहीर प्रचार सभा होणार आहेत. 


   उद्या ११ तारखेला आ. पंकजाताई मुंडे सकाळी १० वा. गोपीनाथ गड येथून हेलिकॉप्टरने नांदेड जिल्ह्यात जाणार आहेत. सकाळी ११ वा. बोधडी ता किनवट येथे भाजपा महायुतीचे उमेदवार भीमराव केराम यांच्यासाठी तर दुपारी १.३० वा. भोकर येथे श्रीजया अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ भोकर येथे जाहीर सभा घेणार आहेत. सायंकाळी ४.३० वा. आ. पंकजाताई बीड जिल्हयात आष्टी मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ शिरूर कासार येथे सभा घेणार आहेत अशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार