महात्मा फुले युवा दलाचे प्रमुख ॲड सतीश शिंदे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन दिले पाठिंब्याचे पत्र

महात्मा फुले युवा दलाचा धनंजय मुंडेंना परळी विधानसभेत पाठिंबा

महात्मा फुले युवा दलाचे प्रमुख ॲड सतीश शिंदे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन दिले पाठिंब्याचे पत्र


परळी वैद्यनाथ (दि. 10) - राष्ट्रवादी काँग्रेस सह महायुतीचे परळी विधानसभेचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांना आता विविध क्षेत्रातून पाठिंबा वाढताना दिसून येत असून महात्मा फुले युवा दलाच्या वतीने धनंजय मुंडे यांना आज बिनशर्त पाठिंबा देण्यात आला आहे. महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक व प्रमुख सतीश शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह धनंजय मुंडे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले.


महात्मा फुले युवा दल ही सामाजिक संघटना गेले अनेक वर्ष कार्यरत असून परळी विधानसभा मतदारसंघासह बीड जिल्ह्यात या संघटनेचे अनेक पदाधिकारी आहेत. 


महात्मा फुले युवा दलाने कोणत्याही अटी शर्ती शिवाय धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला असून धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीमध्ये सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक व प्रमुख सतीश शिंदे यांनी दिला असून, धनंजय मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत करत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. 


यावेळी महात्मा फुले युवा दलाचे प्रमुख ऍड.सतीश शिंदे यांच्यासह जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, जिल्हा सरचिटणीस बाबा राऊत, धनंजय शिंदे, महादेव हाके, राजाभाऊ शिंदे, नवनाथ पांचाळ, गणेश माळी, पप्पू गीते, सतीश खंडागळे, जनार्दन खंडागळे, सिद्धार्थ खंडागळे, रामेश्वर क्षीरसागर, अंगद खंडागळे, पप्पू खंडागळे, सचिन खंडागळे, सलमान कुरेशी यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार