राजेसाहेब देशमुख प्रचंड बहुमताने विजयी होणार- सौ. रत्नमाला राजेसाहेब देशमुख
पतीच्या विजयासाठी सौ. रत्नमाला राजेसाहेब देशमुख मैदानात
अंबाजोगाई, /परळी (प्रतिनिधी):- परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेला बदल हवा आहे. महाविकास आघाडीने राजेसाहेब देशमुख यांना अधिकृत उमेदवारी देऊन या मतदारसंघातील जनतेसमोर नवा पर्याय दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात राजेसाहेब देशमुख प्रचंड बहुमताने विजयी होणार असल्याचा विश्वास सौ.रत्नमाला राजेसाहेब देशमुख यांनी व्यक्त केला आहे. परळी विधानसभा मतदारसंघात ठीक ठिकाणी मतदार बंधू भगिनींना भेटी देऊन मतदान रुपी आशीर्वाद राजेसाहेब देशमुख यांना द्यावेत असे आवाहनही त्यांनी मतदार बंधू-भगिनींना केले.
परळी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ महिलांनी प्रचारार्थ आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रचारार्थ महिलांनी आघाडी घेतल्याने परळी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा बोलबाला पाहावयास मिळत आहे.
परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या परळी शहराध्यक्षा ऍड. कल्पनाताई सतीशराव देशमुख, दिपाली देशमुख, प्रियंका देशमुख आदिसह असंख्य महिलानी परळी शहरात येथे डोर टू डोर महाविकास आघाडीचा व पक्षाचा जाहीरनामा व उमेदवाराचा वचननामा देत महिला प्रचारार्थ फिरत असल्याने उमेदवारांनी प्रचारार्थ आघाडी घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी प्रचारार्थ आघाडी घेतली आहे. परळी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ महिलांनी प्रचारार्थ आघाडी घेतल्याने परळी शहरासह तालुक्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण तयार होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा