पिंप्री बु, सिरसाळा,नागापूर ,गाढे पिंपळगाव सर्कल मध्ये मतदारांशी साधला संवाद
शेतकऱ्यांनो तुमच्या उसाचे टिपरु ही शिल्लक ठेवणार नाही-खा. बजरंग सोनवणे
कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याची नाही तर स्वतः निवडून यायची काळजी- राजेसाहेब देशमुख
पिंप्री बु, सिरसाळा,नागापूर ,गाढे पिंपळगाव सर्कल मध्ये मतदारांशी साधला संवाद
परळी, (प्रतिनिधी):- महाराष्ट्राला धक्का बसला तसा परळीत धक्का बसेल. विजय आमचाच असेल. परळीत गुंडगिरी, दडपशाही, एकाधिकारशाही ला जनता वैतागली आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे प्रचंड मतांनी विजयी होणार आहेत. जर मंत्री महोदयांनी या भागात कामे केली असती तर त्यांना मतदारसंघात गिरट्या मारण्याचे गरजच पडली नसती. शेतकऱ्यांनो ऊस लावा तुमच्या उसाचे टिपरूही मी राहू देणार नाही. असा विश्वास बजरंग सोनवणे यांनी यावेळी शेतकऱ्यांना पिंपळगाव गाढे येथे बोलतांना व्यक्त केला. तर परळी विधानसभा मतदारसंघाच्या प्रगतीसाठी ग्रामीण भागातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी व सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मला मतदानरुपी आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी द्यावी.असे आवाहन महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी यावेळी ठिकठिकाणी झालेल्या प्रचार सभेत केले.
या प्रसंगी बीड जिल्ह्याचे खा. बजरंग सोनवणे, भगवान सेनेचे सरसेनापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते फुलचंद कराड, ज्येष्ठ नेत्या सुधामतीताई गुट्टे, किसान सभेचे बीड जिल्हाध्यक्ष अजय बुरांडे, डॉ. दुष्यंत देशमुख, परळी विधानसभा अध्यक्ष किरण पवार, कॉ. उत्तम माने, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज, शिवसेना जिल्हा उपप्रमुख नारायण सातपुते, शिवसेना तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रभाकर वाघमोडे, सचिव ईश्वर सोनवणे, उपाध्यक्ष महारुद्र कदम, तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर शिंदे, ऍड.सतीशराव देशमुख, वैद्यकीय सेलचे परळी तालुका अध्यक्ष दत्ताराव घोडके, तालुका संघटक बाबासाहेब गव्हाणे, तालुका संघटक हनुमंत माने, किसान सेल उपाध्यक्ष नितीन घोडके, युवक तालुका अध्यक्ष शंकर शेजुळ युवक तालुका उपाध्यक्ष गोविंद देशमुख, तालुका सरचिटणीस राजेभाऊ फड, बाबा शिंदे, मुक्ताराम गवळी, भटक्या विमुक्त तालुका अध्यक्ष गणेश देवकते, रंजीत काळे, रुस्तुम माने, युवराज काळे, बाळासाहेब गरड ,रामेश्वर शिंदे, प्रल्हाद शिंदे, विलास शिंदे, अनिल माने, अंकुश माने आदीसह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख म्हणाले बीड जिल्ह्याला कृषी मंत्री लाभलेले असताना शेतकऱ्यांना न्याय मिळालाच नाही. शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही, अनुदान मिळाले नाही. अग्रीम रक्कम मिळाली नाही.अनेक गावात रस्ते नाहीत. नाल्या नाहीत. अशी अवस्था या विधानसभा मतदारसंघाची झाली असून याचा जाब आपण कृषी मंत्राला विचारला पाहिजे. कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याची काळजी नाही. तर स्वतःला निवडून येण्याची काळजी आहे. पण ते निवडूनही येणार नाहीत आणि सरकारमध्येही जाणार नाहीत. बीड जिल्ह्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. महायुतीला हद्दपार करण्याचा ठरवलेलं आहे.असेही देशमुख म्हणाले.
पिंप्री (बु) सर्कल मधील डिग्रस, पोहनेर, कासारवाडी (रामेवाडी), जळगव्हाण, तेलसमुख, बोरखेड, ममदापूर, सिरसाळा सर्कल मधील हिवरा, गोवर्धन, जयगाव, हसनाबाद, औरंगपूर, तपोवन, पाडोळी, वाका, रेवली, पिंपळगाव गाडे सर्कल मधील कानडी, टाकळी (आ), कौडगाव (हुडा), कौडगाव (घोडा), कौडगाव (सा), पांगरी, लिंबोटा टाकळी (दे), वडखेल, सेलु, सफदराबाद मलनाथपुर, पुरचुंडी, नागापूर सर्कल मधील दौनापूर, वानटाकळी, अस्वलांबा, मांडेखेल, नागपिंप्री, सोनहिवरा, बोधेगाव, कावळ्याचीवाडी, वाघाळा, गोपाळपूर, माळहिवरा, तडोळी , बहादुरवाडी, डाबी आदी गावात मतदार बंधू-भगिनींशी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे व महाविकासाकडे चे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी संवाद साधला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा