Kingmaker: देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब, पुन्हा मुख्यमंत्रीपदावर येणार?

 Kingmaker: देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब, पुन्हा मुख्यमंत्रीपदावर येणार?


यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. सध्या हाती आलेल्या कलानुसार महायुती २१६ जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून आता भाजपकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विधानसभेच्या निकालामुळे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे निकालानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदावर येण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात करत आपला दबदबा कायम ठेवला आहे. महाराष्ट्राचे चाणाक्य म्हणजेच शरद पवार आहेत. भाजपचा आतापर्यंतचा स्ट्राईक रेट पाहिला तर ८४ टक्के असा आहे. तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वात भाजपला सलग तिसऱ्यांचा बहुमत मिळाले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात २०१४, २०१९ आणि यंदा २०२४ ला भाजपला रेकॉर्डब्रेक जागा मिळाल्या आहेत. इतकंच नाहीत उद्धव ठाकरे सोबत नसताना दुसऱ्यांदा सरकार आणण्यात फडणवीसांना यश आले आहे. त्यामुळे शिंदेंच्या सरकारमध्ये उमुख्यमंत्रीपदानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार