MB NEWS:सर्वोच्च नेत्याची सभा मिळाली पण..........
महाविकास आघाडीत समन्वयच नाही:राजेसाहेबांना परळीत काही जणांची 'हलगर्जी बहादुरकी'भोवणार!
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या परळी विधानसभा मतदारसंघात अगोदरच अनेक जणांना उमेदवारीच्या रांगेत झुलवत ठेवून परळी तालुक्यातील सर्वच इच्छुक उमेदवारांना टाळत अंबाजोगाई तालुक्यातील राजसाहेब देशमुख यांना शरद पवार यांनी परळी मतदारसंघाची उमेदवारी दिली. राजेसाहेब देशमुख यांचा संपूर्ण बीड जिल्ह्यात संपर्क जरी असला तरी निवडणुकीसाठी त्या त्या शहरांमध्ये प्रॉपर यंत्रणा असणे आवश्यक असते. सद्यस्थितीला परळी शहरात राजेसाहेब देशमुख यांना व्यक्तिशः प्रतिसाद मिळत असला तरी त्यांची प्रॉपर यंत्रणा मात्र महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावाने दिसून येत नाही. त्यातच ज्यांना जबाबदारी दिली त्या काही जणांच्या 'हलगर्जी बहादूरकी' करण्याच्या पद्धतीने राजेसाहेबांना ही बाब येणाऱ्या काळात अडचणीची ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्याचे विद्यमान कृषिमंत्री धनंजय मुंडे व मुंडे परिवाराचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या परळी विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जोरदार मोर्चे बांधणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. धनंजय मुंडेंना घेरण्याचा चोहोबाजूंनी प्रयत्न आहे.मात्र महाविकास आघाडीतील स्थानिक नेते,पदाधिकारी यांची एकजूट अजुनतरी प्रत्यक्षात दिसून आलेली नाही. शरद पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी बाजूला पडलेले दिसतात. परळीत राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवरच राजेसाहेबांची मदार असल्याचे दिसते. निवडणूक यंत्रणा राबवण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या समन्वयकाची आवश्यकता असते. त्याच बरोबर निवडणूक प्रचार फेऱ्या, सभा, कॉर्नर सभा, प्रसिद्धी विभाग, मीडिया कॅम्पनिंग आदी सर्व व्यवस्थित हाताळणारी समन्वयक पदाची जबाबदारी अथवा त्याची समिती असणे गरजेचे असते. मात्र राजसाहेब देशमुख यांच्या प्रचार यंत्रणेत या सर्व गोष्टींचा परळीत तरी अभाव असल्याचेच दिसून येते.
महाविकास आघाडीतील सर्वोच्च नेते शरद पवारांची सभा परळीत होत आहे. ही सभा उमेदवार राजेसाहेब देशमुखांसाठी अतिशय फायद्याची ठरणारी सभा आहे. प्रचाराच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच शरद पवारांची परळी मतदारसंघाला सभा मिळाली खरंतर ही सभा धडाकेबाज होण्याच्या दृष्टिकोनातून तयारी दिसणे अपेक्षित होते.परंतु या पातळीवर सभेची तयारी पाहिजे त्या शक्तीनिशी केल्याचे दिसत नाही.परळी शहरातील राजेसाहेबांची मदार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावच असल्याचे दिसते.एवढ्या मोठ्या नेत्याच्या सभेचे नियोजन केवळ एखाद्याच व्यक्तिवर आवलंबून राहिल्याने व समन्वयच नसल्याने ताकदीने करण्यात आल्याचे दिसून येत नाही परंतु अशा समन्वयाच्या अभावाचा फटका राजेसाहेबांना बसु शकतो.महाविकास आघाडीत समन्वय आवश्यक आहे अन्यथा राजेसाहेबांना परळीत काही जणांची 'हलगर्जी बहादुरकी' भोवणार हे निश्चित आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा