भामेश्वर मंदिरात भागवत कथेस सुरुवात
दररोज सकाळी 11 ते 4 कथेची वेळ
अमोल जोशी /पाटोदा. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पाटोदा शहरांमधील भामेश्वर मंदिर येथे आजपासून भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार 4 जानेवारी रोजी समाप्ती आहे.
वैकुंठवासी मीराबाई आईसाहेब महासांगवी यांनी गेल्या 44 वर्षांपूर्वी पाटोदा शहरांमध्ये नंदकिशोर महाराजांची भागवत कथा सुरुवात केली होती त्यावेळी पासून आजपर्यंत जवळपास 44 वर्ष पाटोदा शहरांमध्ये नंदकिशोर महाराजांचे मार्गशीर्ष महिन्यामध्ये भागवत कथेचे आयोजन केले जाते यंदा या भागवत कथेचे यजमानपद संजय अंकुश महाजन व संतोष अंकुश महाजन या महाजन कुटुंबीयांनी स्वीकारलेले असून आजपासून भामेश्वर मंदिर पाटोदा येथे दररोज सकाळी अकरा ते एक व 2 ते 4 या वेळेत भागवत कथा होणार आहे तरी पाटोदा शहरातील व परिसरातील भाविक भक्तांनी या भागवत कथा सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाजन परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा