अधिकृत माहिती: पंकजाताई मुंडे घेणार आज मंत्रिपदाची शपथ
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा आज (15 डिसेंबर) नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. आज दुपारी 4 वा.राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा आज नागपूर येथे शपथविधी सोहळा होणार असून या मंत्रिमंडळ विस्तारात भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजाताई मुंडे यांची वर्णी लागली आहे. अधिकृत रित्या पक्षाच्यावतीने पंकजा मुंडे यांच्या नावाची घोषणा झाली असून मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचा संदेश अधिकृतरित्या त्यांना आलेला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकृत फोन करून शपथ घेण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत संदेश दिला आहे. सुरुवातीपासूनच पंकजा मुंडे यांची मंत्रीपदी वर्णी लागणार हे निश्चित होते मात्र शेवटच्या क्षणापर्यंतही शपथविधीत कोण कोण मंत्री होणार याबाबत मोठा सस्पेन्स ठेवण्यात आला होता. आता आज सकाळी संबंधित सर्व मंत्र्यांना पक्षाच्या वतीने निरोप देण्यात आले असून आज दुपारी 4 वा. नागपूर येथील राजभवनात हा शपथविधी पार पडणार आहे. यापूर्वीच्या देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये ही पंकजाताई मुंडे यांनी महिला व बालविकास, ग्रामविकास,जलसंधारण मंत्री म्हणून काम केले होते.बीड च्या पालकमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा