गेवराई येथे 16 डिसेंबर 1971 विजय दिन साजरा
गेवराई ,प्रतिनिधी.....
आज दिनांक 16 डिसेंबर 2024 सोमवार रोजी सकाळी ठीक अकरा वाजता वीर जवान तुझे सलाम माजी सैनिक संघटना गेवराई यांच्या वतीने 1971 चा विजय दिवस जुनी नगरपरिषद गेवराई या ठिकाणी अगदी आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आ. कॅप्टन सुभेदार मेजर राम कृष्ण चेडे साहेब यांनी केले सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तदनंतर उपस्थित सर्व माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण केले नंतर सर्वांनी उभे राहून 1971 च्या शहिदासाठी दोन मिनिट मोहन ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. श्री चिडे साहेबांनी 1971 च्या युद्धाबद्दल सविस्तर माहिती सांगितली 1971 प्रत्यक्ष सहभागी असलेले कॅप्टन अर्जुनराव ढाकणे साहेब यांनी युद्धातील सत्य घटना सांगितली अध्यक्ष श्री बळीराम डोंगरे यांनी 1971 यांचा बद्दल थोडक्यात माहिती दिली कार्यक्रमासाठी खालील माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
कॅप्टन अर्जुन राव ढाकणे साहेब कॅप्टन मेजर रामकृष्ण चेडे साहेब अध्यक्ष बळीराम डोंगरे साहेब बीड जिल्हा ग्राहक मंचच्या उपाध्यक्ष श्री अनिल राव बोर्डे साहेब ज्येष्ठ नागरिक श्री राजहंस साहेब माजी सैनिक उपाध्यक्ष सूर्यकांत गोरे साहेब सचिव भुजंगराव कापरे साहेब श्री दिलीप काकडे साहेब श्री विजयकुमार जगदाळे साहेब रहिमोदिन मोमीन साहेबजगदाळे श्री अशोकराव मरकड साहेब साहेब श्री शिवाजी शिंगाडे साहेब श्री भालचंद्र कोंड्रे साहेब श्री चंद्रकांत बोर्डे साहेब श्री शामराव इगवे साहेब श्री कांबळे साहेब कार्यक्रमास उपस्थित होते सर्वांचे आभार मानून श्री चेडे साहेबांनी कार्यक्रम संपला असे जाहीर केले कार्यक्रम खूपच छान झाला दरवर्षी असाच कार्यक्रम करण्याचे सर्वानुमते ठरले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा