33 वर्षानंतर नागपुरात होणार मंत्र्यांचा शपथविधी......!

 राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार: कोणकोण होणार मंत्री ? : 1991 नंतर प्रथमच होणार नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी !


मुंबई:
 राज्य मंत्रिमंडळाचा उद्या (15 डिसेंबर) नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. उद्या दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत अशी खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे.

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
कोकण- 
1. रविंद्र चव्हाण 
2. नितेश राणे 
मुंबई 
1. मंगलप्रभात लोढा 
2. आशिष शेलार 
3. अतुल भातखळकर 
पश्चिम महाराष्ट्र 
1. शिवेंद्रसिंहराजे भोसले 
2. गोपीचंद पडळकर 
3. माधुरी मिसाळ 
4. राधाकृष्ण विखे पाटील 
विदर्भ 
1. चंद्रशेखर बावनकुळे 
2. संजय कुटे 
उत्तर महाराष्ट्र 
1. गिरीश महाजन 
2. जयकुमार रावल 
मराठवाडा 
1. पंकजा मुंडे
2. अतुल सावे

राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 मंत्री घेणार शपथ
       राष्ट्रवादी काँग्रेसही आपल्या वाट्याला आलेल्या 10 च्या 10 मंत्र्यांच्या जागा भरणार आहे. अजित पवारांनी शपथ घेतली असल्यानं उरलेले नऊ आमदार उद्या मंत्रिपदाचीशपथ घेतील असा अंदाज आहे.  संभाव्य मंत्र्यांची यादी  हाती लागली आहे.

अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
1. छगन भुजबळ
2. आदिती तटकरे
3. अनिल पाटील
4. संजय बनसोडे
5. अजित पवार
6. मकरंद पाटील
7. नरहरी झिरवाळ
8. धनंजय मुंडे 
राज्यमंत्री- 
1. सना मलिक
2. इंद्रनील नाईक

शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी
1. एकनाथ शिंदे 
2. उदय सामंत 
3. शंभूराजे देसाई 
4. गुलाबराव पाटील 
5. दादा भुसे 
6. प्रताप सरनाईक 
7. संजय शिरसाठ
8. भरत गोगावले 
9. आशिष जयस्वाल 
10. योगेश कदम 
11. विजय शिवतारे 
12. आबिटकर किंवा यड्रावकर

1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार
           शपथविधी सोहळ्याच्या  तयारीला राजभवनात सुरुवात झाली आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनच्या हिरवळीवर रविवारी दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.याआधी 1991 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात झाला होता. 1991 ला ज्यावेळी शिवसेना फुटली, त्यानंतर छगन भुजबळ गटाने बंड करत काँग्रेस सोबत शपथ घेतली. 33 वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम हा नागपुरात होणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !