विना परवाना जनावरांच्या वाहतूक केल्याबद्दल दोघावर गुन्हा दाखल :4 लाखाची कारवाई
परळी वैजनाथ ,प्रतिनिधी.......
परळी गंगाखेड रस्त्यावर उक्कडगाव कॅनाॅलजवळ एका बोलरो पिकअप मध्ये जनावरांची विना परवाना वाहतूक होत होती, पोलीसांना माहिती मिळताच या गाडीची तपासणी केली असता जनावरे आढळून आली, या प्रकरणी दोघावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी गंगाखेड रस्त्यावर उक्कडगाव कॅनाॅलजवळ ताजिदिन हनिफ पठाण (रा. पानगाव, रेणापूर), मोहिन शेख पि काळु शेख (परळी) हे दोघे महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच २४ बी ६६७५ मध्ये जनावरे खरेदी विक्रीचा परवाना न बाळगता जनावरांना वेदना होतील अशा रितीने गाडीत एका जागेवरुन दुस-या जागेवर गैरवाजवी पणे आखुड जागेत दोरीने बांधुन चारापाणी न करता जनावरांना क्रूर वागणुक देवुन छळ करुन विनापरवाना घेवुन जात असताना आढळून आला. या प्रकरणात एकूण 4,01,000/- याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण जाधव यांच्या फिर्यादिवरुन येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्री तोटेवाड करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा