देवेंद्र फडणवीसांनी 8 वर्षांपूर्वी दिलेला शब्द पाळला; कोपर्डी दुर्घटनेतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला पोहचले!



कोपर्डीत 8 वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला होता. कुटुंबीयांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केली. तेव्हाच तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो आणि त्या लग्नालाही मी आवर्जून येईन, असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. त्यामुळे दिलेला शब्द पाळत देवेंद्र फडणवीस आवर्जुन लग्नाला उपस्थित राहिले. भाजपचे नेते प्रवीण दरेकर  यांनी याबाबत फेसबुक आणि एक्सवर (आधीचे ट्विटर) पोस्ट केली आहे. 

प्रवीण दरेकर  म्हणाले की, शब्दांचे पक्के... असे आहेत आमचे नेते...आज तो दिवस उगवला आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस  यांनी त्या लग्नसोहळ्याला हजेरी लावत आपला शब्द पाळला. वधू-वराला भरभरून आशिर्वाद दिले. नेता असावा तर असा, दिलेला शब्द पाळणारा...या लग्नात मंगलाष्टक म्हणण्याची संधी मला लाभली, कुटुंबीयांनी ती संधी मला दिली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे. सुजय विखे पाटील, राम शिंदे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते, असं प्रवीण दरेकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


विवाहाचं निमंत्रण होतं, त्यामुळे कोपर्डीत आलो. वधू -वराला शुभेच्छा दिल्या. आज दोन कुटुंब एकत्र येत आहेत. सर्वजण वधू -वराला आर्शीवाद देण्यासाठी या विवाह सोहळ्याला आले आहेत. मी वधू वराला शुभेच्छा देतो असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. 

8 वर्षांपूर्वी काय घडलेलं?


13 जुलै 2016 ला अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तीनही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 ला फाशीची शिक्ष सुनावण्यात आली. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक मोर्चे निघाले, आंदोलनं झाली. त्यानंतर या आरोपींना अखेर न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. दरम्याान महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या या घटनेला आता आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज पीडित मुलीच्या बहिणीचं लग्न होतं. या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावल्याने सर्वत्र कौतुकांचा वर्षावर होत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार